सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते. त्यानंतरही हा सागा सुरूच आहे.
नव वर्षाच्या पहिल्या दिवसाला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भेटीला गेले. तेथे पेनची पत्नी बोनीनं पंतला बेबी सीटींग करायला लावले आणि तो फोटो शेअर केला. बोनीनं आणखी एक फोटो शेअर केला असून तिनं पुन्हा बेबी सीटिंग करशील का, असे विचारले आहे.