ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का?

बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 16:26 IST2019-01-09T16:26:27+5:302019-01-09T16:26:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Free for a babysitting gig? Bonnie Paine tells Rishabh Pant to look after kids again | ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का?

ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का?

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते. त्यानंतरही हा सागा सुरूच आहे. 

नव वर्षाच्या पहिल्या दिवसाला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या भेटीला गेले. तेथे पेनची पत्नी बोनीनं पंतला बेबी सीटींग करायला लावले आणि तो फोटो शेअर केला. बोनीनं आणखी एक फोटो शेअर केला असून तिनं पुन्हा बेबी सीटिंग करशील का, असे विचारले आहे. 


दरम्यान, रोहित शर्माने सिडनीत दाखल होताच  पंतची टर उडवली. कसोटी मालिकेत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करणाऱ्या पंतने बुधवारी एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. तो फोटो रिट्विट करून रोहितने पंतची थट्टा उडवली. नुकताच बाबा झालेल्या रोहितने पंतला बेबी सीटर होशील का असे विचारले. रोहितनचे लिहीले की,''शुभ प्रभात बडी.. तु चांगला बेबी सीटर आहेस, असं मी ऐकलं आहे. आता आम्हाला बेबी सीटरची तातडीनं गरज आहे. तु असशील तर रितिकालाही आनंद होईल.'' 
 

Web Title: Free for a babysitting gig? Bonnie Paine tells Rishabh Pant to look after kids again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.