Join us  

‘फॉर्ममध्ये होतो, पण धावा निघत नव्हत्या’

‘मी फॉर्ममध्येच आहे,’ असा दावा १२७ धावा ठोकणाऱ्या धवनने केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:14 AM

Open in App

दुबई: खराब फॉर्मचा सामना करीत असल्याचा आरोप फटाळून लावताना भारताचा सलामीवीर शिखर धवन याने मंगळवारी, ‘हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकाच्या सलामी लढतीत प्रयत्न करूनही धावा निघत नव्हत्या,’ असे सांगितले. ‘मी फॉर्ममध्येच आहे,’ असा दावा १२७ धावा ठोकणाऱ्या धवनने यावेळी केला.१४ वे एकदिवसीय शतक झळकवल्यानंतर धवन म्हणाला,‘फॉर्मचा प्रश्नच नाही. मी चांगली फलंदाजी करीत होतो, पण धावा निघत नव्हत्या. अलीकडे चांगली सुरुवात केल्यानंतरही मोठी खेळी करण्यात अनेकदा अपयशी ठरलो. ’ मधली फळी अपयशी ठरल्याबाबत विचारताच धवनने सहकाºयाचा बचाव करीत सांगितले की मागील चार वर्षांत आम्ही अनेक मालिका जिंकल्या. काही गमावल्यादेखील. आम्ही अखेर मानव आहोत. चांगले निकाल विसरण्याइतपत चिंता बाळगण्याची गरज नाही. अनेक चांगले निकाल काही अपयशामुळे झाकोळले जाऊ नयेत, असे माझे मत आहे.’ हाँगकाँगच्या फलंदाजांनी कसलेल्या खेळाडूंप्रमाणे फलंदाजी केल्याचे सांगून धवनने त्यांची पाठ थोपटली. पराभवाची धाकधूक मनात होती काय, असे विचारताच ‘पराभवाची शंका कधीही मनला शिवली नव्हती. पण प्रत्येक सामन्यातून धडा घेणे नेहमी चांगले असते,’ असे शिखरने स्पष्ट केले. 

टॅग्स :शिखर धवनभारतआशिया चषक