Join us

Sad News : वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूचे निधन; सायकल चालवत असताना कारनं दिली जोरात धडक

क्रिकेट विश्वाला चटका लावणारी बातमी रविवारी सकाळी येऊन धडकली.

By स्वदेश घाणेकर | Updated: February 7, 2021 09:51 IST

Open in App

वेस्ट इंडिजचे माजी जलदगती गोलंदाज इझ्रा मोसली ( Ezra Moseley) यांचे अपघातात निधन झाले. बार्बाडोसच्या ६३ वर्षीय माजी गोलंदाज सायकलवरून जात होते, तेव्हा ABC हायव्हेवर त्यांना कारनं जोरात धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मोसली यांनी १९९०च्या सुरुवातीला दोन कसोटी व ९ वन डे सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केलं.

''मोसली यांच्या निधनाची बातमी धक्का देणारी आहे. बार्बाडोसमधून ही दुःखद बातमी आली आहे,''असे क्रिकेट वेस्ट इंडिजचे क्रिकेट डायरेक्टर जिमी अॅडम यांनी सांगितले.  १९८१-८१मध्ये शेल शिल्ड या विंडीजच्या प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत मोसली यांनी १८ विकेट्स घेतल्या होत्या. २४व्या वर्षी त्यांना दुखापत झाली, परंतु त्यातूनही त्यानं कमबॅक केलं.  जड़ से उखाड़ देंगे Root ko! अमिताभ बच्चन यांच्या 'त्या' ट्विटला अँड्य्रू फ्लिंटॉफचे भन्नाट उत्तर

 १९८३च्या दक्षिण आफ्रिकेच्या बंडखोर दौऱ्यातीवर जाणारा ते एकमेव खेळाडू होते आणि त्यांच्यावर आजीवन बंदी घातली गेली. त्यानंतर त्यांनी बार्बाडोसमध्ये स्थानिक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. १९९०मध्ये त्यांना इंग्लंड दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले. या दौऱ्यावर त्यांनी इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार ग्रॅहम गूच यांना दुखापतग्रस्त केलं होतं. त्यामुळे गूच यांना रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. ०-१ अशा पिछाडीवरून विंडीजनं ती मालिका २-१ अशी जिंकली होती. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावणाऱ्या वेस्ट इंडिजच्या महिला संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते. 

टॅग्स :वेस्ट इंडिजअपघात