अफगाणिस्तानचा T20 World Cup साठी मोठा डाव, वर्ल्ड कप विजेत्याची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड 

२०२२ च्या आवृत्तीच्या तुलनेत अफगाणिस्तानने त्यांच्या संघात काही बदल केले आहेत. करीम जनात, मोहम्मद इशाक आणि नूर अहमद या युवा खेळाडूंची नावे संघात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:30 PM2024-05-21T16:30:45+5:302024-05-21T16:34:20+5:30

whatsapp join usJoin us
former West Indian great and T20 World Cup Winner Dwayne Bravo as the Bowling Consultant of the Afghanistan Team for the T20 World Cup 2024 | अफगाणिस्तानचा T20 World Cup साठी मोठा डाव, वर्ल्ड कप विजेत्याची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड 

अफगाणिस्तानचा T20 World Cup साठी मोठा डाव, वर्ल्ड कप विजेत्याची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अफगाणिस्तानने ICC Men’s T20 World Cup 2024 साठी त्यांचा १५ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे, ज्यामध्ये राशिद खान संघाचे नेतृत्व करणार आहे. २०२२ च्या आवृत्तीच्या तुलनेत अफगाणिस्तानने त्यांच्या संघात काही बदल केले आहेत. करीम जनात, मोहम्मद इशाक आणि नूर अहमद या युवा खेळाडूंची नावे संघात आहेत. गेल्या वर्षीच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा हशमतुल्ला शाहिदी या संघाचा भाग नाही. आता वेस्ट इंडिजचा माजी महान आणि T20 वर्ल्ड कप विजेता ड्वेन ब्राव्होची ( Dwayne Bravo ) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.  


४० वर्षीय ड्वेन ब्राव्हो हा वेस्ट इंडिजचा माजी मध्यम-जलद गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू होता, त्याने २९५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात ६४२३ धावा केल्या आहेत आणि ३६३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १०० प्रथम श्रेणी, २२७ लिस्ट ए आणि ५७३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक ६२५ विकेट्स घेतल्या आहेत आणि ७ हजाराहून अधिक धावाही केल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तन क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाने संघाला मोठा बूस्ट मिळाला आहे. 


एक खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय अनुभवाव्यतिरिक्त, ब्राव्होने अलीकडेच आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्जसाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्याने वेस्ट इंडिज संघाकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे आणि फ्रँचायझी लीगमध्ये आयपीएल व कॅरेबियन प्रीमिअर लीगचेही जेतेपद त्याच्या नावावर आहेत.  


अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झाद्रान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, नांग्याल खरोटी, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक; राखीव: सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी


अफगाणिस्तानचे वेळापत्रक

  • ४ जून - वि. युगांडा
  • ८ जून - वि. न्यूझीलंड
  • १४ जून - वि. पापुआ न्यू गिनी
  • १८ जून - वि. वेस्ट इंडिज 

Web Title: former West Indian great and T20 World Cup Winner Dwayne Bravo as the Bowling Consultant of the Afghanistan Team for the T20 World Cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.