लंकेचे माजी खेळाडू झोएसा, गुणवर्धने निलंबित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचे माजी खेळाडू नुआन झोएसा आणि अविष्का गुणवर्धने यांना संयुक्त अरब अमिरातीतील एका टी१० लीगमध्ये भ्रष्टाचारात सामील असल्याच्या आरोपावरून निलंबित केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 03:46 IST2019-05-11T03:43:32+5:302019-05-11T03:46:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Former Sri Lanke player Zoysa, quality suspended | लंकेचे माजी खेळाडू झोएसा, गुणवर्धने निलंबित

लंकेचे माजी खेळाडू झोएसा, गुणवर्धने निलंबित

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचे माजी खेळाडू नुआन झोएसा आणि अविष्का गुणवर्धने यांना संयुक्त अरब अमिरातीतील एका टी१० लीगमध्ये भ्रष्टाचारात सामील असल्याच्या आरोपावरून निलंबित केले.
या दोघांपैकी झोएसा हा आधीपासूनच भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित आहे. दोघांना आरोपाचे उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा अवधी देण्यात आला. यूएई बोर्डाकडून आलेल्या अहवालानंतर आयसीसीने लंकेचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक राहिलेला झोएसाला चार, तर गुणवर्धनेला दोन आरोपात निलंबित केले. नेमक्या कुठल्या घटनांवरून दोघांवर कारवाई करण्यात आली, हे मात्र आयसीसीने गुलदस्त्यात ठेवले. हे आरोप मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये यूएईत झालेल्या टी१० लीगशी संबंधित असावेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Former Sri Lanke player Zoysa, quality suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.