धक्कादायक : दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाच्या भावाची गोळ्या घालून हत्या

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज व्हेर्नोन फिलँडर याच्या भावाची हत्या

By स्वदेश घाणेकर | Updated: October 9, 2020 17:33 IST2020-10-09T17:33:35+5:302020-10-09T17:33:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Former South Africa pacer Vernon Philander's brother shot dead | धक्कादायक : दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाच्या भावाची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक : दक्षिण आफ्रिकेच्या माजी गोलंदाजाच्या भावाची गोळ्या घालून हत्या

दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज व्हेर्नोन फिलँडर याचा भाऊ टिरोन फिलँडर याची केप टाऊन येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 32 वर्षीय टिरोन हा शेजाऱ्यांना पाणी देण्यासाठी गेला होता आणि तेव्हा हा प्रसंग घडला. पोलिस आरोपीचा तपास घेत आहेत.  

व्हेर्नोन यानं याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि त्यांनी या संकटकाळी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यानं लिहिलं की,''माझ्या होमटाऊन राव्हेन्स्मीड येथे माझ्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या संकट काळात आमच्या कुटुंबीयांची प्रायव्हेसीचा आदर करा, अशी मी विनंती करत आहे.'' 

    
''या खूनाचा पोलीस तपास करत आहेत आणि मी मीडियाला विनंती करू इच्छितो की, त्यांना त्यांचा तपास करू द्या. या प्रकरणाची कोणतीच माहिती अद्याप आमच्याकडे नाही आणि पसरत असलेल्या अफवांमुळे घरच्यांना नाहक त्रास होत आहे,'' असेही त्यानं लिहिलं.

फिलँडरनं ६४ कसोटी, ३० वन डे आणइ ७ ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे २२४, ४१ व ४ विकेट्स घेतल्या आहेत.  

Web Title: Former South Africa pacer Vernon Philander's brother shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.