IPL 2024: हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची घोडचूक!

Hardik Pandya And Rohit Sharma: हार्दिक पांड्या प्रथमच मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 02:51 PM2024-04-03T14:51:28+5:302024-04-03T14:55:28+5:30

whatsapp join usJoin us
former player Virender Sehwag said, hardik pandya must learn from Rohit sharma on how to use jasprit bumrah | IPL 2024: हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची घोडचूक!

IPL 2024: हार्दिकने रोहितकडून 'ही' गोष्ट शिकायलाच हवी; सेहवागने सांगितली पांड्याची घोडचूक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 Updates: आयपीएल २०२४ च्या आपल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने मुंबईला पराभवाची धूळ चारली. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई खेळत आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्यामुळे अद्याप वाद सुरू आहे. चाहते हार्दिकला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. (Hardik Pandya Troll) अशातच मुंबईच्या सततच्या पराभवांनंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने हार्दिकला एक मोलाचा सल्ला दिला आहे. (IPL 2024 News) 

मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचा वापर योग्यरित्या होत नसल्यावरून सेहवागने हार्दिकला सल्ला दिला. सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारून पाहुण्या मुंबईचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यातील हैदराबादच्या डावातील १३ षटकांपर्यंत बुमराहने त्याचे दुसरे षटक टाकले नव्हते. संघाचा प्रमुख गोलंदाज असताना देखील त्याला डावलल्याने हार्दिकवर टीका झाली. 

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक 
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, हैदराबादविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई होत असताना बुमराहने चांगली कामगिरी केली. पण, १३ षटकांपर्यंत त्याने दुसरे षटक टाकले नव्हते. हे सर्वकाही कर्णधारावर अवलंबून असते. परिस्थितीनुसार बुमराहचा वापर करायला हवा. रोहित शर्माने आतापर्यंत बुमराहचा योग्यरित्या वापर केला. ही गोष्ट हार्दिकने माजी कर्णधाराकडून शिकायला हवी. बुमराह संघ अडचणीत असताना बळी घेण्यात माहिर आहे. त्यामुळे मला वाटते की, त्याचा परिस्थितीनुसार वापर करून अधिक फायदा घ्यायला हवा. सेहवाग 'क्रिकबझ'वर सामन्याचे विश्लेषण करताना बोलत होता. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. 

Web Title: former player Virender Sehwag said, hardik pandya must learn from Rohit sharma on how to use jasprit bumrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.