Join us

"तो कोणती नशा करून बोलतोय...", धर्मांतराच्या दाव्यावरून हरभजन आणि इंझमाममध्ये जुंपली

पाकिस्तानचे माजी खेळाडू सातत्याने त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 12:00 IST

Open in App

पाकिस्तानचे माजी खेळाडू सातत्याने त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. भारतीय खेळाडूंवर खालच्या पातळीवर टीका असो की मग पराभवानंतर दिलेले अनोखे कारण असो. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम-उल-हकने देखील आता एक विधान करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगबद्दल एक धक्कादायक दावा केला. भज्जी धर्मपरिवर्तन करण्यासाठी इच्छुक होता, असा दावा इंजमामने केला. पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दावा करताच हरभजनचा पारा चढला अन् त्याने इंजमामवर बोचरी टीका केली. 

हरभजन सिंगने इंजमाम-उल-हकच्या व्हिडीओवर व्यक्त होताना म्हटले की, हा कोणती नशा करून बोलत आहे? मी भारतीय आणि शीख असल्याचा मला अभिमान आहे. ही लोक काहीही बोलत राहतात. इंजमामचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून भारतीय चाहते त्याला लक्ष्य करत आहेत. 

इंजमामने काय म्हटले? व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की इंजमाम सांगतो की, हरभजन एकेकाळी त्याच्या मौलानाचे ऐकत असे आणि ते जे काही बोलत होते त्या गोष्टींचे तो पालन करायचा. इंझमामने यावेळी इरफान पठाण, झहीर खान आणि मोहम्मद कैफ यांचीही नावे घेतली. तसेच पाकिस्तानमधील खेळाडूंनी नमाज अदा करण्यासाठी एक वेगळी खोली बनवली होती, जिथे इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि झहीर खान यांच्यासह काही भारतीय खेळाडूही जात असत. भज्जीवर त्याच्या मौलानाचा खूप प्रभाव होता आणि त्याला त्याच्यासारखे व्हायचे होते, असे इंझमामने सांगितले. एकूणच भज्जीला शीख धर्म सोडून इस्लाम धर्मात यायचे होते असे इंजमामने सांगितले. 

टॅग्स :हरभजन सिंगमुस्लीमपाकिस्तान