Join us  

मुलगी झाली हो! पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाचवे कन्यारत्न, पण...

यापूर्वी आफ्रिदीला चार मुली आहेत. आपली चुलत बहिण नादिरा आफ्रिदीबरोबर शाहिदने लग्न केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 1:05 PM

Open in App

कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला पाचवे कन्यारत्न झाले आहे. आफ्रिदीने ही माहिती ट्विटरवर फोटो पोस्ट करून दिली आहे. आफ्रिदीला पाचवी मुलगी झाली असली तरी त्याचे आपल्या मुलींबाबतचे वर्तन योग्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. आफ्रिदी स्वत: एक खेळाडू होता. पण आपल्या मुलींना तो मैदानी खेळ खेळण्यासाठी पाठवत नाही. आफ्रिदीच्या या गोष्टीवर जोरदार टीका झाली. पण तरीही आफ्रिदीला या निर्णयाबाबत खेद नाही. उलट माझा निर्णय योग्यच असल्याचे त्याने बोलून दाखवले आहे.

यापूर्वी आफ्रिदीला चार मुली आहेत. आपली चुलत बहिण नादिरा आफ्रिदीबरोबर शाहिदने लग्न केले आहे. पण आफ्रिदी लग्नानंतर काही गोष्टींसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे. शाहिद आपल्या मुलींना मैदानी खेळ खेळायला देत नसल्याचे वृत्तही सर्वत्र पसरले आहे. पण आपल्या या निर्णयाबद्दल शाहिदला खेद वाटत नाही. कुणी काहीही म्हणो, माझा निर्णय योग्यच आहे, असे शाहिदने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.

पाकिस्तानमध्ये येऊन खेळा, शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला चॅलेंज!

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील संबंध हे जगजाहीर आहेत. त्यामुळेच उभय देशांमधील द्विदेशीय क्रिकेट मालिका गेली अनेक वर्ष बंद आहे. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांसह आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात आणि तो सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. पण, आगामी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये सामना होईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आशिया क्रिकेट परिषदेनं आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला दिलं आहे. पण, टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातून सुवर्णमध्य काढायचा झाल्यास टीम इंडियाचे सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्याची चाचपणीही सुरू आहे. 

टीम इंडियानं पाकिस्तानात न खेळण्याची भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) 2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. पण, त्वरित त्यांनी माघारही घेतली. त्यामुळे यंदाच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी होणारा आशिया चषक कोठे खेळवण्यात येईल, यावर अजून सस्पेन्स कायम आहे. त्यात आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं उडी घेतली आहे. आशिया चषक स्पर्धेबाबत बीसीसीआयनं आपली भूमिका स्पष्ट करताना भारतीय खेळाडू पाकिस्तानात खेळण्यात उत्सुक नाहीत, त्यामुळे भारताचे सामना तटस्थ ठिकाणी खेळवा, असे सांगितले होते. तरीही आफ्रिदीनं टीम इंडियाला थेट पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्याचं आव्हान केलं आहे. पण, दोन्ही देशांमधील मालिका तटस्थ ठिकाणी व्हाव्यात, या मतावरही त्यानं सहमती दर्शवली. 

''संपूर्ण पाकिस्तान सूपर लीग येथे खेळवण्यात आली. त्यामुळे जगभरात सकारात्मक संदेश गेला आहे. शिवाय श्रीलंका आणि बांगलादेश संघानंही पाकिस्तान दौरा केला आणि येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येऊन खेळण्याची मी वाट पाहत आहे,''असे मत आफ्रिदीनं व्यक्त केलं. तो पुढे म्हणाला,''आशिया चषक भारत आणि पाकिस्तान येथे खेळवण्यात यावा. पाकिस्तान आणि भारत यांनी एकत्र येऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवं. त्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको. दोन देशांमध्ये अनेक समस्या आहेत आणि एकत्र येऊन चर्चा केल्याशिवाय ते सुटणारे नाही. पण, आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांनी खेळायलाच हवं.''

बीसीसीआयनं दिलं सडेतोड उत्तरपाकिस्तान क्रिकेट मंडळानं (पीसीबी) काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) इशारा दिला होता. जर आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तान संघ 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेईल, असा इशारा पीसीबीनं दिला होता. पण, अवघ्या काही तासांत पीसीबीनं घुमजाव करत तो इशारा किती पोकळ होता, हे स्वतः सिद्ध केले. पण, बीसीसीआयनं पाकला जशासतसे उत्तर दिले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानाबाहेरची सामना रंगला आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2013 पासून दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही. उभय संघ आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. 2018मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे आशिया कप खेळवण्यात आला होता. भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यताच नाही, असे स्पष्ट मत बीसीसीआयनं व्यक्त केले. ''पीसीबी या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे, हा आमच्यासाठी मुद्दाच नाही. आम्ही तटस्थ ठिकाणी खेळणार हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे पाकिस्तानात आमचा संघ पाठवण्याचा संबंधच येत नाही,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीभारतपाकिस्तान