Join us  

Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?

न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि त्याची पत्नी आजारी आहे व फुफ्फुसच्या आजारानं झगडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:21 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांवर आहे त्या देशातच अडकून राहण्याची वेळ आली आहे आणि त्यात न्यूझीलंडचा माजी गोलंदाज इयान ओ'ब्रायन याचाही समावेश आहे. न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि त्याची पत्नी आजारी आहे व फुफ्फुसच्या आजारानं झगडत आहे. त्यामुळे तिला कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे, इयान याला वाटते. त्यामुळे त्याची चिंता अधिक वाढली आहे. 

तो काही कामानिमित्त न्यूझीलंडमध्ये दाखल आला होता.''मला माझ्या पत्नीची चिंता आहे. तिला फुफ्फुसाचा त्रास आहे आणि तिला त्वरित संसर्ग होऊ शकतो,'' असे इयानने सांगितले. त्यानं 22 कसोटी, 10 वनडे आणि चार ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. इयानच्या नावावर 73 कसोटी विकेट्स आहेत. 2008मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं 75 धावांत 6 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. . तो पुढे म्हणाला,'' हा व्हायरस तिचा जीव घेईल. तिच्यासोबत माझी मुलही आहेत आणि तिची 80 वर्षांची आईही सोबत आहे. त्यामुळे माझी चिंता अधिक वाढली आहे.'' 

तो सध्या वेलिंग्टन येथे अडकला आहे आणि त्याचे कुटुंबीय लंडन येथे स्थायिक आहेत. लंडन येथे जाण्यासाठी त्यानं विमानाची तिकिटं काढली, परंतु विमानच रद्द झाल्यानं त्याचे पैसे वाया गेले आणि आता त्याच्याकडे घरी परतण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे त्याला पैसे गोळा करावे लागत आहेत. आता त्याच्याकडील पैसे संपले आहेत आणि पैसे गोळा करण्यासाठी त्यानं चाहत्यांना आवाहन केलं आहे. त्यासाठी त्यानं चाहत्यांसोबत व्हिडीओ कॉल द्वारे गप्पा मारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. चाहते या दरम्यान सचिन तेंडुलकरपासून ते कोणत्याही विषयावर त्याच्याशी चर्चा करू शकतात.   

 अन्य महत्त्वाच्या बातम्या

लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य

'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यान्यूझीलंडसचिन तेंडुलकर