हरभजन सिंगने आयेशाबद्दल दिली होती माहिती; त्यानंतरही Shikhar Dhawan प्रेम रोखू शकला नाही!

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर घवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याची (Divorce) माहिती समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:59 AM2021-09-08T09:59:45+5:302021-09-08T10:00:08+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian Spinner Harbhajan Singh had given information about Ayesha To Cricketer Shikhar Dhawan | हरभजन सिंगने आयेशाबद्दल दिली होती माहिती; त्यानंतरही Shikhar Dhawan प्रेम रोखू शकला नाही!

हरभजन सिंगने आयेशाबद्दल दिली होती माहिती; त्यानंतरही Shikhar Dhawan प्रेम रोखू शकला नाही!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर घवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याची (Divorce) माहिती समोर आली आहे. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहीत दिली आहे. 2012 मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. 2014 मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल 9 वर्षांनंतर त्यांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे. 

आयशा प्रोफेशनल किक बॉक्सर आहे आणि त्यामुळे तिला फिटनेसचं महत्त्व खूप माहिती आहे. आयशामुळे शिखर धवनलाही आपलाय फिटनेस राखण्यात मदत मिळायची. धवन आयशापेक्षा 10 वर्ष लहान आहे. आयशाने आधी ऑस्ट्रेलियन बिझनसमनशी लग्न केलं होतं. त्या दोघांच्याही दोन मुली आहेत. त्याच्याशी नातं तुटल्यानंतर आयशा फेसबुकच्या माध्यमातून शिखर धवनच्या संपर्कात आली.

दोघंही एकमेकांवर प्रेम करू लागले आणि त्यांनी लग्न केलं.  त्या दोघांना एक मुलगाही आहे, ज्याचं नाव जोरावर. धवनने आयशाच्या दोन मुलींनाही आपलं नाव दिलं. 27 ऑगस्ट 1975 साली भारतात जन्मलेल्या आयशाकडे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे वडील बंगाली तर आई ब्रिटीश होती. बंगालमध्ये एकत्र काम करताना त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. आयशाच्या जन्मानंतर ते ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले होते. 

शिखर धवनने आयेशाबद्दलच्या आपल्या भावना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला सांगितल्या होत्या. हरभजनने त्याला आयेशाच्या वैवाहिक स्टेटसबद्दल सांगितले होते, परंतु जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा इतर काहीही महत्त्वाचं नसतं. विवाहित असल्याचं माहित असूनही शिखर या बंगाली ब्युटीवरील आपले प्रेम रोखू शकला नव्हता. आयेशा 10 वर्षांनी मोठी आहे, यावरही शिखरला आक्षेप नव्हता.

घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता- आयेशा मुखर्जी

एकदा घटस्फोट झाल्यावर असं वाटलं की दुसऱ्यांदा बरंच काही धोक्यात आलं होतं, मला बरंच काही सिद्ध करायचं होतं. म्हणून जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हा ते खूप भीतीदायक होतं. घटस्फोट हा वाईट शब्द असल्याचं मला वाटलं. दोनदा माझा घटस्फोट झाला. शब्दांचे अर्थ आणि त्यांचे संबंध कसे असू शकतात हे अतिशय मजेशीर आहे. मी पहिल्यांदा जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा खूप भीती वाटली होती. त्यावेळी अयशस्वी ठरल्याची भावना मनात आली आणि खुप काही चुकीचं करतेय असं वाटत होतं," असं आयशानं म्हटलं आहे.

मी सर्वांना निराश केलं असं मला वाटलं, स्वार्थी वाटलं आणि माझ्या पालकांना निराश केलं. माझ्या मुलांचा मी अपमान करत आहे अशी भावना मनात आली आणि काही प्रमाणात मला मी देवाचाही अपमान केला असल्याचंही वाटलं. घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता," असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे.

ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी पहिला विवाह

आयेशाचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. या जोडप्याला 2000 मध्ये आलिया ही मुलगी झाली. तिचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे झाला होता. पाच वर्षांनी, धाकट्या रियाच्या आगमनामुळे आयेशा आणि तिचा ऑस्ट्रेलियन पती 2005 मध्ये दुसऱ्यांदा पालक झाले.

वडिलांचा कट्टर विरोध

शिखर धवनचे कुटुंब त्यांच्या निर्णयावर फारसे आनंदी नव्हते. आयेशासोबतच्या लग्नासाठी आई -वडिलांना राजी करणे हे शिखरसाठी अवघड काम होते. शिखर धवनचे वडील महेंद्र पाल धवन त्यांच्या विवाहाच्या सक्त विरोधात होते, पण त्याची आई सुनैना धवन त्यांच्या विवाहाबाबत सकारात्मक होत्या.

Web Title: Former Indian Spinner Harbhajan Singh had given information about Ayesha To Cricketer Shikhar Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.