Vinod Kambli arrested : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला वांद्रे पोलिसांकडून अटक; जाणून घ्या कारण 

Vinod Kambli arrested : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला रविवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:16 PM2022-02-27T20:16:54+5:302022-02-27T20:17:16+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian cricketer Vinod Kambli was arrested for hitting a car under the influence of alcohol. Further investigation is underway: Bandra Police | Vinod Kambli arrested : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला वांद्रे पोलिसांकडून अटक; जाणून घ्या कारण 

Vinod Kambli arrested : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला वांद्रे पोलिसांकडून अटक; जाणून घ्या कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vinod Kambli arrested : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला रविवारी वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर दारूच्या नशेत कार चालवून वांद्रे येथील एका सोसायटीच्या गेटवर टक्कर मारण्याचा आरोप आहे. पोलिसांनी ANIला सांगितके की, विनोद कांबळीने राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर गाडीने टक्कर मारली. त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे.  

याआधीही विनोद कांबळी अनेक वादांत अडकला आहे. २०१५ मध्ये त्याच्यासह पत्नीवर काम करणाऱ्या बाईने गंभीर आरोप केले होते. २०१५मध्ये विनोद व पत्नी एंड्रिया हेव्हिट यांच्याविरुद्ध FIR दाखल झाला होता. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले म्हणून तिला तीन दिवस खोलीत बंद केल्याचा आरोप दोघांवर होता. पण, या दोघांनी तिच्यावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला. 

विनोद कांबळीने भारताकडून १७ कसोटी सामन्यांत ४ शतकं व ३ अर्धशतकांसह ५४.२०च्या सरासरीने १०८४ धावा केल्या आहेत. १०४ वन डे सामन्यांत त्याने २ शतकं व १४ अर्धशतकांसह २४७७ धावा केल्या आहेत. 

Web Title: Former Indian cricketer Vinod Kambli was arrested for hitting a car under the influence of alcohol. Further investigation is underway: Bandra Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.