Indian cricketer arrested: गुजरातमधील वडोदरा येथे अकोटा पोलिसांनी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब मार्टिनला दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, जेकब मार्टिन अकोटा दांडिया बाजार पुलावर कार चालवत असताना, त्याचे नियंत्रण सुटले आणि कार दोन-तीन वाहनांना धडकली. घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. माहिती मिळताच अकोटा पोलिस घटनास्थळी पोहोचले. गुजरातच्या वडोदरा शहरात दारूच्या नशेत वाहन चालवणे आणि अपघात घडवणे या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. २६ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली.
कसा झाला अपघात?
जेकब मार्टिन हे त्यांच्या कारमधून अकोटा भागातील पुनीत नगर सोसायटीकडे जात होते. रात्री २:३०च्या सुमारास अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन कारला जोरात धडक दिली. या धडकेत तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. अकोटा पोलिसांनी मार्टिन यांची तपासणी केली असता ते नशेत असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्टिन हे त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त एका मित्राच्या घरी गच्चीवर पार्टी करत होते. याआधीही बेकायदेशीरपणे मद्यपान केल्याप्रकरणी पोलिसांनी मार्टिनसह सहा जणांना ताब्यात घेतले होते.
कोण आहेत जेकब मार्टिन?
जेकब मार्टिन यांनी १९९९ ते २००१ या काळात भारतासाठी १० एकदिवसीय (ODI) सामने खेळले आहेत. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व करताना १३८ सामन्यांत ९,१९२ धावा केल्या आहेत, ज्यात २३ शतकांचा समावेश आहे. १९९८-९९ च्या रणजी हंगामात १००० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. निवृत्तीनंतर ते कोचिंग आणि व्यवसायात सक्रिय होते. मात्र, या गंभीर गुन्ह्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
काही वर्षांपूर्वी आली होती बिकट वेळ
सात वर्षांपूर्वी मार्टिनचा वडोदरा येथे अपघात झाला होता. त्यामध्ये त्याच्या यकृताला आणि फुफ्फुसाला इजा झाली होती. तसेच गंभीर मार लागला होता. त्याच्या कुटुंबाकडे त्याच्या उपचारासाठी पैसे संपले होते आणि त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता होती. त्यानंतर मार्टिनच्या कुटुंबाने त्याच्या उपचारासाठी निधीची मागणी केली, ज्यामुळे बीसीसीआय, बडोदा क्रिकेट असोसिएशन आणि अनेक क्रिकेटपटू पुढे आले होते.
Web Summary : Ex-cricketer Jacob Martin arrested in Vadodara for drunk driving after crashing into multiple vehicles. Martin, under the influence, lost control of his car, causing significant damage. This isn't his first brush with the law for alcohol-related incidents. Previously, Martin faced financial hardship after a severe accident.
Web Summary : पूर्व क्रिकेटर जैकब मार्टिन वडोदरा में शराब पीकर गाड़ी चलाने के आरोप में गिरफ्तार। नशे में होने के कारण मार्टिन ने कई वाहनों को टक्कर मार दी, जिससे काफी नुकसान हुआ। शराब से संबंधित घटनाओं के लिए यह उनका पहला मामला नहीं है। इससे पहले, एक गंभीर दुर्घटना के बाद मार्टिन को वित्तीय कठिनाइयों का सामना करना पड़ा था।