Join us

MS Dhoni : धोनीनं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन; पाकिस्तानच्या खेळाडूला दिलं स्पेशल गिफ्ट

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला एक अनोखी भेट दिली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 09:23 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार (Former Indian Captain) आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार (Chennai Super Kings Captain) एमएस धोनीने (MS Dhoni) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला (Haris Rauf) एक अनोखी भेट दिली आहे. हॅरिस राऊफनं ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. धोनीनं यामुळे सर्वांचंच मन जिंकलं आहे. धोनीनं रौफला आपली सीएसकेची जर्सी भेट म्हणून दिली. दरम्यान, रौफनं वेस्ट इंडिजचा (West Indies) अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचेही आभार मानले. याआधी, T20 वर्ल्ड कपमध्ये हॅरिसचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्कॉटलंडचा संघ पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये आला होता. त्याचा व्हिडीओही पीसीबीने शेअर केला होता.

"लिजेंड आणि कॅप्टन कूल एमएस धोनीने मला त्याचं शर्ट भेट देत सन्मान केला आहे. तो अजूनही त्याच्या दयाळूपणाने आणि चांगल्या कृतींनी मन जिंकत आहे. आंद्रे रसेलचाही अशाप्रकारच्या सपोर्टसाठी धन्यवाद," असं रौफनं ट्वीट करताना म्हटलं. धोनी ७ नंबरची जर्सी परिधान करतो. हॅरिस सध्या बिग बॅश लीगमध्ये (BBL) मेलबर्न स्टासकडून खेळत आहे. हॅरिस रौफ २०२१ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्यानं ४ ओव्हर्समध्ये २५ धावा दिल्या होत्या. तसंच त्यानं हार्दिक पांड्याचीही विकेट घेतली होत. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनी आता पुन्हा आयपीएल २०२२ मध्ये दिसणार आहे. या मालिकेत तो चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्वही करणार आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतपाकिस्तान
Open in App