माहीची डुलकी अन् एअर होस्टेसने गुपचूप बनवला video; पण चाहते संतापले, म्हणाले...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग जगभर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:31 PM2023-07-30T16:31:13+5:302023-07-30T16:32:01+5:30

whatsapp join usJoin us
Former Indian captain MS Dhoni was traveling on a flight with his wife Sakshi when an air hostess took a video and fans were outraged  | माहीची डुलकी अन् एअर होस्टेसने गुपचूप बनवला video; पण चाहते संतापले, म्हणाले...

माहीची डुलकी अन् एअर होस्टेसने गुपचूप बनवला video; पण चाहते संतापले, म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग जगभर आहे. आपल्या लाडच्या धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सोशल मीडियापासून दूर असलेला धोनी फारसा चाहत्यांच्या संपर्कात नसतो. त्यामुळे त्यांचा कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर आला की तो वेगाने व्हायरल होतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी फ्लाइटमध्ये डुलकी काढताना दिसतो आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एअर होस्टेसने बनवला असून चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, धोनी पत्नी साक्षीसोबत प्रवास करत आहे. साक्षी मोबाईल वापरताना दिसत आहे, तर धोनी डुलकी काढत आहे. व्हायरल व्हिडीओवरून धोनीचे चाहते संतापल्याचे दिसते. खरं तर अनेकांनी धोनी आणि त्याच्या पत्नीच्या गोपनीयतेवर हल्ला केला असल्याची टीका केली. तर काहींनी एअर होस्टेसवर ताशेरे ओढले.

धोनीची डुलकी एअर होस्टेसच्या कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी फिल्मी जगतात पाऊल ठेवले आहे. त्यांनी प्रोडक्शनच्या दुनियेत प्रवेश केला असून २८ जुलै रोजी त्यांचा 'एलजीएम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. साक्षी धोनीला चित्रपट पाहायला आवडतात. यामुळेच त्यांनी व्यवसायाची योजना आखण्यासाठी चित्रपट जगताची निवड केली. पती धोनीसोबत मिळून तिने आपले नवीन प्रोडक्शन हाऊस उघडले आहे.

Web Title: Former Indian captain MS Dhoni was traveling on a flight with his wife Sakshi when an air hostess took a video and fans were outraged 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.