Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन् कुणाचीही पर्वा न करता धोनीने धरले साक्षीचे पाय

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुबीयांना पुरेसा वेळ देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 10:45 IST

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहेकुटुबीयांना तो पुरेपूर वेळ देत आहे

मुंबईः भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो आपल्या कुटुबीयांना पुरेसा वेळ देत आहे. यशाची अनेक शिखरं पादाक्रातं केली असली तरी धोनीचे पाय अजुनही जमिनीवर आहेत आणि हे त्याने कृतीतून अनेकदा दाखवूनही दिले आहे. त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकण्याची कृती केली आहे. पत्नी साक्षीला मदत करण्यासाठी त्याने चक्क तिचे पाय धरले. 

साक्षीला नवीन बुट घालण्यासाठी धोनीने मदत केली आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांची पर्वा न करता धोनीने असं केल्याने त्याच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला आहे. साक्षीनेही माहीचे कौतुक करण्याची संधी सोडली नाही. तिनेही त्वरीत तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर तिने लै भारी कमेंटही केली.   भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यामुळे धोनी या दौऱ्यावर संघासोबत नाही. त्यामुळे विश्रांतीचा वेळ तो मुलगी जिवा आणि पत्नी साक्षी यांना पुरेसा वेळ देत आहे. नुकतेच धोनीने पत्नीसह बॉलिवूड सेलिब्रिटी रणवीर सिंग आणि दिपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.  इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर धोनीला ट्वेंटी-20 संघातूनही वगळण्यात आले. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत खेळता आले नाही. असे असले तरी 2019च्या वन डे वर्ल्ड कपसाठी संघातील त्याचे स्थान पक्के मानले जात आहे.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीबीसीसीआय