गाड्यांचा शौकीन माहीची नवीन झलक; रांचीच्या रस्त्यावर धोनीची भटकंती, video viral

MS Dhoni : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी महागड्या गाड्यांचा खूप शौकीन आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:28 PM2023-07-31T15:28:19+5:302023-07-31T15:28:40+5:30

whatsapp join usJoin us
former indian captain MS Dhoni driving 1973 Pontiac Trans Am SD-455 in Ranchi, watch here viral video  | गाड्यांचा शौकीन माहीची नवीन झलक; रांचीच्या रस्त्यावर धोनीची भटकंती, video viral

गाड्यांचा शौकीन माहीची नवीन झलक; रांचीच्या रस्त्यावर धोनीची भटकंती, video viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी महागड्या गाड्यांचा खूप शौकीन आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग जगभर आहे. आपल्या लाडच्या धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सोशल मीडियापासून दूर असलेला धोनी फारसा चाहत्यांच्या संपर्कात नसतो. अशातच धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सर्वांचा लाडका माही गाडी चालवताना दिसत आहे.  

गाडी चालवण्याचा शौकीन असलेल्या धोनीच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्यांचा साठा आहे. काही दिवसांपूर्वी धोनीचा एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये तो विंटेज १९८० रोल्स कार चालवताना दिसला होता. आता कॅप्टन कूल धोनीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो जुनी गाडी चालवण्याचा आनंद घेत आहे. खरं तर माही रांचीमध्ये १९७३ पोंटियाक ट्रान्स एएम एसडी-४५५ गाडी चालवत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी यांनी फिल्मी जगतात पाऊल ठेवले आहे. त्यांनी प्रोडक्शनच्या दुनियेत प्रवेश केला असून २८ जुलै रोजी त्यांचा 'एलजीएम' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. साक्षी धोनीला चित्रपट पाहायला आवडतात. यामुळेच त्यांनी व्यवसायाची योजना आखण्यासाठी चित्रपट जगताची निवड केली. पती धोनीसोबत मिळून तिने आपले नवीन प्रोडक्शन हाऊस उघडले आहे.

Web Title: former indian captain MS Dhoni driving 1973 Pontiac Trans Am SD-455 in Ranchi, watch here viral video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.