Join us  

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू आता अमेरिकेत खेळणार; बीसीसीआयनं दिली परवानगी! 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिका आपला दबदबा निर्माण करण्यासाठी कंबर कसत आहे. अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी मागील काही दिवसांत अनेक खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:09 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिका आपला दबदबा निर्माण करण्यासाठी कंबर कसत आहे. अमेरिकेत क्रिकेट खेळण्यासाठी मागील काही दिवसांत अनेक खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली. यामध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान येथील स्थानिक क्रिकेटपटूंचा अधिक समावेश आहे. आता यात भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नावही जोडलं गेलं आहे. भारताला २०१२मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद (Unmukt Chand) हा आता अमेरिकेत खेळणार आहे. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्ली, उत्तराखंड या संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत. उन्मुक्त चंद याच्याआधी स्मित पटेल यानंही हा निर्णय घेतला होता. तोही २०१२च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य होता. ( India's 2012 Under-19 World Cup-winning captain Unmukt Chand has announced his retirement from Indian Cricket. He will be plying his trade in the US) 

उन्मुक्तनं ट्विट करून त्याच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली, पण त्यात त्यानं तो अमेरिकेत खेळणार असल्याचे असे कुठेच म्हटलेले नाही. वयाच्या २८ व्या वर्षी त्यानं निवृत्ती जाहीर केली ( Unmukt Chand retires from Indian cricket at the age of 28 ).  भारतानं २०१२चा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखील जिंकला होता. त्यानं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ धावांची खेळी केली होती. उन्मुक्तनं ६७ प्रथम श्रेणी सामन्यात ८ शतकं व १६ अर्धशतकांसह ३३७९ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२० सामन्यांत ७ शतकं व ३२ अर्धशतकांसह ४५०५ धावा आहेत, तर ट्वेंटी-२०त त्यानं ७७ सामन्यांत १५६५ धावा केल्या असून त्यात ३ शतकं व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. 

टॅग्स :उन्मुक्त चंदभारतीय क्रिकेट संघअमेरिका
Open in App