भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुबईत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत पार्टी करताना दिसला. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धोनी आणि हार्दिक एका मित्राच्या बर्थडे पार्टीत दिसले आणि तिथे दोघं बॉलिवूड सिंगर बादशाह याच्यासोबत गाणं गाताना व डान्स करताना दिसले. धोनीची पत्नी साक्षीने हे व्हिडिओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केले आहेत. हार्दिक पांड्या नुकताच न्यूझीलंड दौऱ्यावरून परतला आहे. ट्वेंटी-२० मालिकेत तो भारतीय संघाचा कर्णधार होता आणि भारताने ही मालिका १-० ने जिंकली होती.
साक्षी धोनीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी गायक बादशाह आणि डीजे चेतनसोबत डान्स करताना दिसत आहे. बादशाहसोबत तो 'काला चष्मा' गाण्यावर गाताना आणि डान्स करताना दिसला. यामध्ये हार्दिक आणि धोनी दोघेही लिप सिंक करत आहेत. साक्षीने या वाढदिवसाच्या पार्टीचे पाच व्हिडिओ पोस्ट केले आहेत, त्यापैकी तीनमध्ये धोनी दिसत आहे. एकात तो टेबलावर बसला आहे आणि बाकीचे पाहुण्यांशी बोलत आहेत. ही बर्थडे पार्टी कुलजिंदर सिंग नावाच्या भारतीय वंशाच्या ब्रिटीश व्यावसायिकाची आहे.
धोनी शेवटचा मे महिन्यात आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. धोनीने १० जुलै २०१९ मध्ये भारताकडून शेवटचा खेळला आणि १५ ऑगस्ट २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"