Join us  

Virender Sehwag suggestion Mumbai Indians : सलग तीन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला वीरेंद्र सेहवागचा सल्ला; सूचवलं एका खेळाडूचं नाव!

Virender Sehwag suggestion Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 10:20 PM

Open in App

Virender Sehwag suggestion Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून त्यांना हार मानावी लागली. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचा पारा चढलेला सर्वांना पाहिला. मुंबईच्या यशात खारीचा वाटा उचलणारे ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, नॅथन कोल्टर नायल हे गोलंदाज यंदा वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. त्यामुळे आता फक्त जसप्रीत बुमराह हा एकमेव सक्षम पर्यात मुंबईकडे आहे.  

त्यांनी डॅनिएल सॅम्स व टायमल मिस्ल या परदेशी खेळाडूंसह बसील थम्पी याचाही उपयोग करून पाहिला, परंतु त्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही. अशात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने मुंबई इंडियन्सला सल्ला दिला आहे. तो म्हणाला,''मागच्या वर्षापर्यंत मुंबई इंडियन्सकडे नॅथन कोल्टर नायल होता. जो त्यांच्याकडे रिप्लेसमेंटचा योग्य पर्याय होता.  पण, आता जर मुंबईची बेंच स्ट्रेंथ पाहिली, तर व्यवस्थापनाला कोणाला अंतिम ११मध्ये खेळवावे यासाठी दोनवेळा विचार करावा लागेल. मयांक मार्कंडे, जयदेव उनाडकत, रिली मेरेडिथ व अर्षद खान हे बाकावर बसून आहेत. त्यांच्याशिवाय संजय यादव, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकिन आणि अन्य असेही खेळाडू आहेत, परंतु ते बसील थम्पी किंवा डॅनिएलच्या जागी खेळवता येईल, एवढे तगडे नाहीत.''

''बाकावर बसलेल्या खेळाडूंपैकी मला असे वाटते की जयदेव उनाडकतला संधी मिळायला हवी. त्याच्याकडे पुरेसा अनुभव आहे आणि पुणे संघाकडून त्याने आयपीएलचे एक पर्व गाजवले आहे. त्याला १५-१६ कोटी रुपये मिळाले होते, परंतु पुढील पर्वात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तो एकच असा पर्याय आहे, जो सध्याच्या अंतिम ११मध्ये जागा घेऊ शकतो. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पॉवर प्लेमध्ये तीन षटकं फेकणारा गोलंदाज मुंबईकडे नाही आणि जसप्रीतकडून ही तीन षटकं फेकून घेणे मुंबईला परवडणारे नाही,''असेही वीरू म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सविरेंद्र सेहवाग
Open in App