Join us  

Shocking: 'वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळपट्टीशी छेडछाड', पराभवासाठी रोहित-द्रविड जबाबदार?

१९ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सने हार मानावी लागली. भारताचे २४० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४३ षटकांच्या आत पार केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 5:34 PM

Open in App

रोहित शर्माच्य नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवणार अशी खात्री तमाम भारतींना होती.  सर्वजण २०२३च्या वन डे वर्ल्ड कप फायनलकडे आस लावून बसले होते, परंतु अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हिरमोड झाला आणि ऑस्ट्रेलियाने भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा केला. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ ( Mohammed Kaif ) याने आता खळबळजनक दावा केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळट्टीची छेडछाड करण्यात आली होती आणि ती यजमान संघाच्या फायद्यासाठी तयार केल्याचा दावा कैफने केला आहे. 

१९ नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारताला ६ विकेट्सने हार मानावी लागली. भारताचे २४० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४३ षटकांच्या आत पार केले. या सामन्यात पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाला हरवणाऱ्या रणनीतीत भारतीय संघ स्वतः अडकल्याचे कैफने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.  

कैफने वर्ल्ड कप फायनलबाबत काही खळबळजनक दावे केले आहेत. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी घरच्या संघासाठी अनुकूल बनवण्यासाठी क्युरेटरने छेडछाड केल्याचा दावा कैफने केला आहे. कैफने म्हटले की, ''मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित सलग तीन दिवस खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते तासंनतास बाजूला उभे राहुन खेळपट्टी पाहत होते. खेळपट्टीचा रंग बदलताना मी पाहिले. खेळपट्टीवर पाणी मारले जात नव्हते, गवतही नव्हते. भारताला ऑस्ट्रेलियाला स्लोव्ह ट्रॅकवर खेळवायचे होते. हेच खरं आहे, मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवा अथवा नका ठेऊ.'' एकप्रकारे कैफने या पराभवासाठी राहुल द्रविड आणि रोहितला जबाबदार धरले.

कैफ म्हणतो, "ऑस्ट्रेलियाच्या संघात पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क असल्याने भारताला संथ खेळपट्टी द्यायची होती आणि ही आमची चूक होती. बरेच लोक म्हणतात की क्युरेटर त्यांचे काम करतात, त्यांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करत नाही, हे मूर्खपणाचे आहे. तुम्ही खेळपट्टीभवती फिरत असताना,'कृपया पाणी देऊ नका, फक्त गवत काढा,'असे सांगता. हे सत्य आहे आणि तुम्ही घरच्या मैदानावर खेळताना असं करायला हवं. पण, यावेळी आपण जरा अती केलं.'' 

साखळी सामन्यात भारताविरुद्धच्या पराभवातून पॅट कमिन्सने धडा घेतला असल्याचे कैफने सांगितले. कैफ म्हणतो, ''चेन्नईच्या सामन्यातून कमिन्सला शिकायला मिळाले की, संथ खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजी करणे कठीण असते. अंतिम फेरीत कोणीही प्रथम क्षेत्ररक्षण केले नाही, परंतु कमिन्सने केले. खेळपट्टीशी छेडछाड करून आम्ही गोंधळ घातला.''

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराहुल द्रविडरोहित शर्मा