लंडनः इंग्लंडचे माजी क्रिकेटपटूचे मंगळवारी निधन झाले. इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये ग्लॅमोर्गन क्लबचे माजी खेळाडू असलेल्या मॅल्कोल्म नॅश यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. वेस्ट इंडिजचा महान फलंदाज गॅरी सोबर्स यांनी कौंटी क्रिकेटच्या एका सामन्यात नॅश यांच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते. या एका प्रसंगामुळे नॅश यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्धी मिळाली.
लंडन येथील लॉर्ड्सवर डिनर करत असताना नॅश अचानक जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे त्यांचे निधन झाले. त्यांनी इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटच्या 17 मोसमात प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले
त्यांनी 1966 ते 1983 या कालावधीत 336 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 993 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी 991 विकेट्स या ग्लॅमोर्गन क्लबकडून घेतल्या आहेत. त्यांनी फलंदाजीतही आपली छाप पाडली आहे. 469 डावांमध्ये त्यांनी 7129 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे. 1967-1985 या कालावधीत 271 लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी 324 विकेट्स घेतल्या होत्या.
![]()
पण, 1968च्या एका सामन्यात सोबर्स यांनी त्यांच्या एका षटकार सहा षटकार खेचले होते. त्यानंतर लँकशायर क्लबच्या फ्रँक हयेसनेही नॅश यांच्या एका षटकात पाच षटकार व एक चौकार मारला होता.