Join us

Alastair Cook argument with Moeen Ali: इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक आणि मोईन अली यांच्यात ऑन एअर भांडण, व्हिडीओ व्हायरल!

Alastair Cook argument with Moeen Ali : इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक आणि स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यात ऑन एअर भांडण झालं होतं आणि आता England vs New Zealand यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीतही त्यावरून वाद रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 15:50 IST

Open in App

Alastair Cook argument with Moeen Ali : इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक आणि स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यात ऑन एअर भांडण झालं होतं आणि आता England vs New Zealand यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीतही त्यावरून वाद रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या अॅशेस मालिकेतील सामन्यातला हा प्रसंग आहे. यावेळी ३४ वर्षी मोईन अली जो रूटच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक करत होता आणि रूट हा खेळाडूंबाबत अधिक भावनिक होता असेही तो म्हणाला. मोईनचे हे कौतुक कूकला फार रूचले नाही आणि त्याने हा मुद्दा वैयक्तिक करताना, तू माझ्या नेतृत्वावर टीका करतोस का?, असा थेट सवाल मोईनला केला. 

मोईनने तेव्हा गमतीने हो  थोडं बहुत, अशी प्रतिक्रिया दिली. रूटच्या नेतृत्वाखाली आपली कामगिरी अधिक चांगली झाल्याचेही मोईनने कबुल केले.  पण, त्याचवेळी कूकने मोईनला एका गोष्टीची आठवण करून दिली. रुटने कित्येकदा मोईनला संघाबाहेर बसवल्याचे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देताना मोईन म्हणाला, हो हे खरं आहे, परंतु माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या वर्षात तू मला १ ते ९ क्रमांकावर फलंदाजी करायला लावलीस. 

चार महिन्यानंतर हे दोघं पुन्हा ऑन एअर समोरासमोर आले. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या समालोचनासाठी कूक व मोईन हे एकत्र आले. यावेळी पुन्हा जुनं भांडण उकरून काढले गेले. कूकने सुरुवात केली. तो म्हणाला, मी सुट्टीवरून परत येत होतो, मध्यरात्री सरळ स्टुडिओकडे चालत होतो. मी हसतमुख मोईनला भेटलो, तो नेहमीप्रमाणे खूप आनंदी होता. असं असलं तरी, तो प्रत्येकाला म्हणाला, 'मी खूप चांगला कर्णधार नव्हतो आणि मी खूप चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही'.   मोईनने त्याचे मत मांडले. तो म्हणाला, रूटला खेळाडूंबद्दल "खूप जास्त सहानुभूती" आहे आणि त्याने कूकसोबत त्याची तुलना केली नाही. "हे थोडेसे संदर्भाबाहेर होते. मी मुळात असे म्हणत होतो की रूटला तुमच्यापेक्षा खेळाडूंबद्दल खूप जास्त सहानुभूती आहे! आणि मी एकदाही सांगितले नाही की तू चांगला कर्णधार नाहीस किंवा त्यापेक्षा चांगला नाहीस. मग, तुम्ही ते वैयक्तिकरित्या मनावर घेतले आणि ते व्हायरल झाले. 

इंग्लंडकडून  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान कूकने मिळवला आहे. २०१८मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. १२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने  ५९ कसोटी सामन्यांत नेतृत्व सांभाळले आणि त्यापैकी २४ मध्ये विजय मिळवला.  

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंड
Open in App