ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या नको - झहीर खान 

विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन होण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 04:39 PM2023-11-28T16:39:09+5:302023-11-28T16:39:57+5:30

whatsapp join usJoin us
former cricketer Zaheer Khan backs Rohit Sharma as the captain at the 2024 T20 World Cup not hardik pandya | ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या नको - झहीर खान 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या नको - झहीर खान 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

zaheer khan on hardik pandya : तब्बल १३ वर्षांनंतर यंदा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपेल, अशी आशा तमाम भारतीयांना होती. मात्र, वन डे विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला अन् भारत किताबापासून एक पाऊल दूर राहिला. विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन होण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभव विसरून भारतीय संघाने आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या काही ट्वेंटी-२० मालिकेत संघाचा भाग नसल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली. खरं तर आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकात केवळ हार्दिक भारतीय संघाची धुरा सांभाळू शकतो, असे मानले जात आहे. मात्र, झहीर खानने एक मोठे विधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले. 
 
२०२४च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात देखील भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्याच खांद्यावर असायला हवी, असे झहीर खानने म्हटले. तो क्रिकबझशी बोलत होता. "रोहित शर्मा सद्याच्या संघासोबत चांगला जोडला गेला आहे, त्याच्याकडे फारसा अनुभव आहे. दबावाची स्थिती कशी हाताळायची हे त्याला माहित आहे. त्यामुळे मला वाटते की, रोहित कर्णधार म्हणून योग्य आहे. 

लवकरच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार 
झहीर खानने आणखी सांगितले की, आता ट्वेंटी-२० विश्वचषक सुरू होण्यासाठी फक्त सहा महिने उरले आहेत. दरम्यान, आयपीएल सारखी मोठी स्पर्धा होणार आहे, ज्यामुळे तयारी मजबूत होण्यास खूप मदत होईल. अशा परिस्थितीत रोहित शर्मा की हार्दिक पांड्या हा मुद्दा उपस्थित होईल. पण, हार्दिकच्या पुनर्वसनावर आणि पुनरागमनावरही बऱ्याच बाबी अवलंबून असतील. 

हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी   
हार्दिक पांड्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटच्या सहा सामन्यांत भारतीय संघाची कमान सांभाळली आहे. या सहा सामन्यांपैकी हार्दिकने टीम इंडियाला ५ सामन्यांत विजय मिळवून दिला, तर एक सामना बरोबरीत संपला. म्हणजेच ट्वेंटी-२० मध्ये कर्णधार म्हणून हार्दिकने एकाही सामन्यात पराभवाची चव चाखलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिकने एकूण ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी ८ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर २ सामने भारताला गमवावे लागले. 

हार्दिक पांड्याला पुन्हा संघात घेणं मुंबई इंडियन्सला फायद्याचं ठरेल का?

हो (1712 votes)
नाही (1403 votes)

Total Votes: 3115

VOTEBack to voteView Results


 

Web Title: former cricketer Zaheer Khan backs Rohit Sharma as the captain at the 2024 T20 World Cup not hardik pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.