Join us  

चहल-कुलदिपच्या क्षमतेवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न

भारतीचे फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांनी दक्षिण आफ्रिकेत भेदक मारा करत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 9:58 AM

Open in App

पोर्ट एलिझाबेथ :  भारतीचे फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांनी दक्षिण आफ्रिकेत भेदक मारा करत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला.  दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार शॉन पोलॉकनं त्यांच्या या कामगिरिचे कौतूक केलं. पण त्यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंडमध्ये ते भारतीय विजयात आपली भूमिका बजावू शकतील का? असा प्रश्न पोलॉकनं केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुासर, पोलॉक असे म्हणाला की, इंग्लंडमधील खेळपट्या या वेगळ्या आहेत. तिथे चेंडूला स्विगं मिळेलच असे नाही. विश्वचषकापूर्वी

तूम्ही इंग्लंड दौऱ्यावर जात आहात त्यामध्ये तूम्हाला त्याचे अकलान करता येईल.  इंग्लंडच्या खेळपट्या या वेगवान गोलंदाजांना साथ देतात, फिरकी गोलंदाजांना तिथे हवा तसा स्विंग मिळत नाही. त्यामुळं भारतीय संघानं इंग्लंड दौऱ्यानंतर चहल-कुलदिपच्या कामगिरीचे आकलन करावे. 

भारताने एकदिवसीय मालिका जिंकली असली तरी त्याआधी झालेल्या कसोटी मालिकेत या संघाची वागणूक सकारात्मक नव्हती, अशी टीका द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पॉलक याने केली आहे. तयारीविना उतरलेला भारतीय संघ ज्या पद्धतीने खेळला त्यावर मी निराश झालो. कसोटी जिंकण्याची पाहुण्यांची कुठलीही तयारी दिसली नाही. तयारी करण्यासाठी भारताने फार आधी द. आफ्रिकेत दाखल व्हायला हवे होते. तुमचे लक्ष्य काय आणि ते मिळविण्यासाठी तुम्ही काय तयारी केली याला फार महत्त्व असते. देशाबाहेर मालिका जिंकायची असेल तर त्यादृष्टीने तयारीला प्राधान्यक्रम द्यायलाच हवा, असे पॉलक यांचे मत आहे.

दरम्यान, चहल-कुलदिप जोडीनं पाच वन-डेमध्ये 30 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.  एक प्रकारे त्यांनी फलंदाजांना आपल्या तालावरच नाचवले. विशेष म्हणजे यामध्ये हाशिम आमला, फाफ डुप्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांचाही समावेश आहे. त्यांनाही फिरकी गोलंदाजी समजली नाही. त्यामुळे रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांना एकदिवसीय संघाबाहेर बसविण्याचा निर्णय चुकीचा नव्हता हे स्पष्ट झाले आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८कुलदीप यादवयुजवेंद्र चहल