मुंबई : बीसीसीआय मुख्यालयात सोमवारी होणाऱ्या अनौपचारिक बैठकीत माजी क्रिकेटपटू ‘हित जोपासण्याच्या’ मुद्यावर चर्चा करतील. आघाडीचे माजी क्रिकेटपटू या बैठकीत सहभागी होण्याची आशा आहे. त्यात प्रशासकांच्या समितीतील (सीओए) किमान एक सदस्य उपस्थित राहील.
बैठकीत ‘हित जोपसण्याच्या’ मुद्यावर प्रदीर्घ चर्चा होण्याची शक्यता आहे. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर व माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर बैठकीत सहभागी होणार असल्याचे निश्चित आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण व राहुल द्रविड हेदेखील या बैठकीमध्ये सहभागी होण्याची आशा आहे.
त्याचवेळी दिग्गज सचिन तेंडुलकर बैठकीमध्ये सहभागी होणार नसल्याचे वृत्त आहे. हरभजन सिंगही सोमवारी बैठकीमध्ये सहभागी होणार नाही, पण त्याने या मुद्यावर आपले मत पत्र लिहून बीसीसीआयला कळविले आहे. त्याचप्रमाणे या मुद्यावर नोटीस पाठविण्यात आलेला माजी कर्णधार द्रविड यानेही या नोटीसला उत्तर पाठविले आहे.