Join us

राज्यपाल पदावर झाली 'या' माजी क्रिकेटपटूची नेमणूक

खेळाडूंनी राजकारणात यावे का आणि राजकारणांनी खेळाच्या प्रशासनात प्रवेश करावा का, यावर मतांतरे आहेत. पण सध्याच्या घडीला काही राजकारणी क्रीडा क्षेत्रात पाहायला मिळतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 16:29 IST

Open in App

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राज्यपाल हे पद फार गाजत आहे. निवडणूकांचा निकाल लागल्यापासून ते गेल्या काही दिवसांपर्यत राज्यपाल चर्चेचा विषय ठरले होते. पण आता राज्यपाल पदावर 'या' माजी क्रिकेटपटूची नेमणूक करण्यात आली आहे.

खेळाडूंनी राजकारणात यावे का आणि राजकारणांनी खेळाच्या प्रशासनात प्रवेश करावा का, यावर मतांतरे आहेत. पण सध्याच्या घडीला काही राजकारणी क्रीडा क्षेत्रात पाहायला मिळतात. बऱ्याच क्रीडा संघटनांवर राजकारणी दिसतात. त्याचबरोबर राजकारणात बरेच माजी खेळाडू आपल्याला दिसतात.

सध्याच्या घडीला राज्यपाल पद हे चर्चेत असताना एका माजी महान क्रिकेटपटूला हे कमान सोपवण्यात आली आहे. या खेळाडूने देशाचे नेतृत्व करताना संघाला बरेच विजय मिळवून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळामध्ये या खेळाडूने नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा विश्वविक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. श्रीलंकेचा माजी महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनला श्रीलंकेतील नॉर्दन प्रोव्हिन्सचे राज्यपाल पद देण्यात आले आहे.

टॅग्स :श्रीलंका