Join us  

आधी 'भाव' खाल्ला मग नकार दिला! वॉटसनचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झटका

shane watson pakistan coach: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या शोधात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:25 PM

Open in App

Pakistan Cricket Board: ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनपाकिस्तानी संघाचा प्रमुख प्रशिक्षक होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड राष्ट्रीय संघासाठी परदेशी प्रशिक्षकांच्या शोधात आहे. माजी खेळाडू मोहम्मद हफिजची हकालपट्टी झाल्यापासून ही जागा रिक्त आहे. आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे, या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मुख्य प्रशिक्षक पदासाठी शेन वॉटसनशी संपर्क साधत आहे. या पदासाठी पीसीबीने वॉटसनला कोट्यवधी रूपयांचे मानधन देणार असल्याचे मान्य केले. 

पण, शेन वॉटसन पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक होणार नसल्याचे कळते. त्याने या शर्यतीतून माघार घेतली आहे. सध्या तो इतरही लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने आयपीएलमधील समालोचनाच्या वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ESPNcricinfo ने दिली. 

वॉटसनची प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून माघार ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटसनने सध्याच्या कोचिंग आणि समालोचनाच्या वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा आयपीएलमध्ये समालोचन करार आहे आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससह मेजर लीग क्रिकेटमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणूनही तो कार्यरत आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा देखील तो प्रशिक्षक आहे. 

शुक्रवारी क्रिकेट पाकिस्तानने सांगितले होते की, तगडे मानधन दिल्यामुळे वॉटसन प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार झाला आहे. सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्याने नकार दर्शवला होता. पण भरीव मोबदला निश्चित झाल्यानंतर त्याने निर्णय बदलला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वॉटसनला दरमहा सुमारे ४.६ कोटी रूपये देण्यासाठी तयार होते. जर हा करार यशस्वी झाला असता तर वॉटसन पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात महागडा प्रशिक्षक ठरला असता.

टॅग्स :शेन वॉटसनपाकिस्तानआॅस्ट्रेलियाआयपीएल २०२४