Join us

हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 

Natasa Stankovic: घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टाँकोविच ही स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीसोबत मौजमजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 00:17 IST

Open in App

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याचा घटस्फोट होऊन आता दोन महिने उलटत आले आहेत. सध्या हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेची तयारी करत आहे. दुसरीकडे घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टाँकोविच ही स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीसोबत मौजमजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांनी दोन महिन्यांपूर्वी एकमेकांमधील वैवाहिक नातं संपुष्टात आणलं होतं. त्यानंतर नताशा मुलगा अगत्स्या याला घेऊन दुबईला गेली होती. हल्लीच ती भारतात आली होती. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अगत्स्या यांचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.

दरम्यान, नताशासोबत स्विमिंग पूलमध्ये मौजमजा करत असलेल्या तरुणाचं नाव अलेक्झँडर अॅलेक्स एक अभिनेता आहे. तो त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी  प्रसिद्ध आहे. त्याने गिरगिट या वेबसिरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नताशा आणि अॅलेक्स हे एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगितले जाते. हार्दिक पांड्यासुद्धा अॅलेक्स याला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. एकीकडे अॅलेक्ससोबत नताशाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याचं एका परदेशी गायिकेसोबत अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या