Join us

दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करण्यावर भर

आयपीएलसोबतच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासात मी रविवारी रात्री प्रथमच अन्य फॅ्रन्चायझी संघाच्या विजयाची प्रतीक्षा करीत होतो. सनरायजर्स हैदराबाद संघाने प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी आम्हाला मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करावा, असे वाटत होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 05:17 IST

Open in App

- व्हीव्हीएस लक्ष्मणआयपीएलसोबतच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासात मी रविवारी रात्री प्रथमच अन्य फॅ्रन्चायझी संघाच्या विजयाची प्रतीक्षा करीत होतो. सनरायजर्स हैदराबाद संघाने प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी आम्हाला मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करावा, असे वाटत होते. आम्ही समूहाने त्या दिवशी बेंगळुरूत हॉटेलमध्ये संघाच्या रुममध्ये एकत्र आलो आणि मोठ्या स्क्रीनवर भावनात्मक होत ही लढत बघितली.शेवटी हे संघाचे अनधिकृत सेशन चेहऱ्यावर हास्य फुलवून गेले. मुंबई इंडियन्सने विजय मिळविल्यानंतर आम्हाला आनंद झाला आणि आम्ही प्ले-आॅफसाठी पात्र ठरल्याचा जल्लोष साजरा केला. पुढची फेरी गाठण्याचा आनंद साजरा करताना आम्हाला नशिबाची साथ लाभल्याची कल्पना होती. आता आमचे नशीब घडवणे आमच्याच हातात आहे.आयपीएलच्या प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला आम्ही स्पर्धेची दोन टप्प्यामध्ये विभागणी करतो. पहिल्या टप्प्यात प्ले-आॅफसाठी पात्र ठरण्याचा उद्देश असतो. आम्ही हा टप्पा यशस्वीपणे पार केला. आता स्पर्धेत पुढील वाटचाल करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत काय चुका झाल्या यापासून आम्हाला धडा घ्यावा लागेल. पण त्याचसोबत आमचे लक्ष आता बुधवारी दिल्लीविरुद्ध खेळल्या जाणाºया एलिमिनेटर लढतीवर केंद्रित झाले आहे.दिल्ली कॅपिटल्स संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली असली तरी त्यांच्याविरुद्ध सरशी साधण्यास आम्ही सक्षम आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. एलिमिनेटरचे दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करणे महत्त्वाचे ठरते. साखळी फेरीतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही वर्चस्व मिळविल्यानंतर संधी गमावल्या. अशा चुका या लढतीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.स्पर्धेच्या या टप्प्यात प्रत्येकाला प्रतिस्पर्धी संघाची शक्तिस्थळे व कमकुवत बाजूंची कल्पना आलेली असते. त्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी रणनीती ठरविताना विशेष अडचण भासत नाही. पण हे केवळ अर्धे कार्य झाले. पण खेळाडूंनी मैदानावर रणनीतीवर योग्य अमल करणे आवश्यक आहे. आमचे खेळाडू आपली भूमिका चोख बाजवतील, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :आयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाद