साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी

मदतनिधी सामना : ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पॅरीचे स्विकारले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 04:52 AM2020-02-10T04:52:40+5:302020-02-10T04:54:25+5:30

whatsapp join usJoin us
five years later, Sachin tendulkar played again | साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी

साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा केली फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी आॅस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीतील पीडितांसाठी आर्थिक मदत उभारण्यासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन डावांदरम्यान एक षटक फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सुमारे साडेपाच वर्षांनंतर सचिनने पुन्हा फटकेबाजी केली. या खेळीसाठी सचिनला आॅस्ट्रेलिया महिला संघाची सुपरस्टार अष्टपैलू एलिस पॅरीने आव्हान दिले होते आणि सचिनने ते स्वीकारले होते.


सचिनला पुन्हा एकदा हातात बॅट घेतलेले बघणे चाहत्यांसाठी सुखावणारा अनुभव ठरला. मैदानावर फलंदाजी करताना हे पाच मिनिट कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेल्या त्याच्या १०० शतकांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरले. कारण त्यामुळे मिळालेली सर्व रक्कम चॅरिटीमध्ये जाणार आहे.


खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी सचिनला खेळापासून दूर रहाण्याचा सल्ला दिला आहे, पण तरी त्याने येथे फलंदाजी केली. या षटकात त्याने पहिल्याच चेंडूवर मनगटाच्या जोरावर कलात्मक चौकार मारुन शानदार सुरुवात केली. शिवाय संपूर्ण षटक त्याने ज्या सहजतेने फलंदाजी केली, ते पाहून अनेकांना जुन्या ‘मास्टर ब्लास्टर’ची आठवण झाली.


आपल्या कारकिर्दीत पांढऱ्या व निळ्या पोशाखामध्ये भारतातर्फे खेळणारा सचिन या विशेष सामन्यासाठी पिवळ्या रंगाच्या जर्सीसह त्याच्य रंगाच्या हेल्मेटमध्ये फलंदाजीसाठी उतरला. त्याच्या हातात नेहमीच्या बॅट ऐवजी कुकाबुराचा लोगो असलेली बॅट होती. पॅरीने म्हटले की, ‘सचिनविरुद्ध गोलंदाजी करणे आणि ब्रायन लाराला फलंदाजी करताना बघणे शानदार अनुभव ठरला.’ (वृत्तसंस्था)

Web Title: five years later, Sachin tendulkar played again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.