Join us

अरबाज खानला सट्टेबाजीवर पोलिसांनी विचारले हे पाच प्रश्न

पोलिसांनी अरबाजला पाच प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरे देताना अरबाजने आपण सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. कोणते होते ते पाच प्रश्न, ते जाणून घेऊया....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 18:15 IST

Open in App
ठळक मुद्देघरच्यांचा विरोध असूनही मी सट्टेबाजी करत होतो, असे अरबाजने सांगितले आहे.

मुंबई : अरबाज खानला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शुक्रवारी समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे तो शनिवारी पोलिसांपुढे हजर झाला. यावेळी पोलिसांनी अरबाजला पाच प्रश्न विचारले आणि या प्रश्नांची उत्तरे देताना अरबाजने आपण सट्टेबाजी करत असल्याची कबुली दिली. कोणते होते ते पाच प्रश्न, ते जाणून घेऊया....

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी सट्टेबाज सोनू जालानला अटक केली. त्याची चौकशी करत असताना अरबाजचे नाव पुढे आले. त्यामुळे अरबाजला आज चौकशीसाठी बोलावण्यात आले. यावेळी तीन तास अरबाजची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये आपण सट्टेबाजी करत होतो, त्यामध्ये जवळपास तीन कोटी रुपये आपण हरलो, घरच्यांचा विरोध असूनही मी सट्टेबाजी करत होतो, असे अरबाजने सांगितले आहे. आयपीएलबरोबरच आंतरराष्ट्रीय सामन्यांवरही मी सट्टा लावायचो, असे अरबाजने सांगितले आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अरबाजला पाच प्रश्न विचारले ते पुढील प्रमाणे... 1. तू सोनू जालानबरोबर सट्टेबाजी करत होतास का? 2. सोनू आणि तुझी ओळख कुठे झाली, तू त्याला कसा ओळखतोस?3. तू सट्टेबाजी करत होतास हे कुटुंबियांना माहिती होते का?4. आत्तापर्यंत किती रक्कम तू सट्टेबाजीमध्ये लावली आहेस ?5. सोनूने तुला कधी फोनवर धमकी दिली होती का?

टॅग्स :अरबाज खानक्रिकेट सट्टेबाजीक्रिकेटआयपीएल