आयपीएलच्या आगामी हंगामाआधी अबू धाबी येथे मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहेय या लिलावात कोणत्या खेळाडूला किती भाव मिळणार याची चर्चा रंगत असताना लिलावात कोट्यवधी बेस प्राइजसह नाव नोंदणी करणाऱ्या ५ खेळाडूंनी बोली लागण्याआधीच संपूर्ण हंगामात उपलब्ध राहणार नाही, याची असे कळवले आहे. यात सर्वच्या सर्व परदेशी खेळाडूंचा समावेश असून एकाने तर लग्नाचा मुहूर्त काढल्याची माहिती समोर येत आहे. कोट्यवधीच्या पॅकेजची आस बाळगून मोजके सामने खेळण्याची माहिती देणाऱ्या या क्रिकेटर्संना मिनी लिलावात भाव मिळणे कठीणच वाटते. इथं जाणून घ्या कोण आहेत ते क्रिकेटर आणि किती सामने खेळण्यासाठी त्यांनी तयारी दर्शवली आहे त्यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहेत ते परेदशी खेळाडू ज्यांनी बोली लागण्याआधी मोजके सामने खेळण्याची दिलीये माहिती
ज्या खेळाडूंनी मिनी लिलावाआधी आयपीएल हंगामात मोजके सामन्यासाठी उपलब्ध राहणार असे कळवले आहे त्यात ऑस्ट्रेलियाचा अॅश्टन एगर, विल्यम सदरलँड, आणि जॉश इंगिस या तिघांचा समावेश आहे. याशिवाय न्यूझीलंडचा अॅडम मिल्ने आणि दक्षिण आफ्रिकेचा रायली रोसो याचा समावेश आहे.
कोण किती सामन्यासाठी उपलब्ध असेल?
अॅश्टन एगर याने २ कोटी बेस प्राइजसह मिनी लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे. IPL च्या आगामी हंगामात फक्त ६५ टक्के उपलब्ध असेन, असे त्याने कळवले आहे. आयपीएल पदार्पणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विल्यम सदरलँड याने १ कोटी बेस प्राइजसह नाव नोंदणी केली आहे. तो ८० टक्के सामन्यांसाठी उपलब्ध असेल. अॅडम मिल्ने ९५ टक्के तर रायली रोसो आणि जॉश इंग्लिस अनुक्रमे २० आणि २५ टक्के सामन्यांसाठीच उपलब्ध असतील.
लग्न ठरलंय म्हणून प्रितीच्या पंजाबनं त्याला रिलीज केलं
२ कोटी बेस प्राइज असणारा ऑस्ट्रेलियन विकेट किपर बॅटर जॉश इंग्लिस आगामी हंगामात फक्त ४ सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. IPL दरम्यानंच त्यानं लग्नाचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळेच तो आयपीएलच्या हंगामातील बहुतांश सामन्याना मुकणार आहे. ही गोष्ट त्याने PBKS फ्रँचायझीला कळवली होती. तो संपूर्ण हंगामात खेळणार नसल्यामुळेच त्याला रिलीज करण्याचा निर्णय पंजाब फ्रँचायझी संघाने घेतला होता.