सूरत - क्रिकेटच्या इतिहासात एका युवा भारतीय खेळाडूने आणखी एक विक्रम रचला आहे. मेघालयच्या आकाश कुमार चौधरीने रणजी ट्रॉफी सामन्यात अरुणाचल प्रदेशविरोधात खेळताना केवळ ११ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक बनवण्याचा जागतिक रेकॉर्ड या खेळाडूने त्याच्या नावावर नोंदवला आहे. २५ वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज आकाशने आपल्या धमाकेदार खेळीने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि इंग्लंडच्या वेन व्हाईटचा १२ चेंडूत अर्धशतक करण्याचा मागील विश्वविक्रम मोडला, जो त्याने २०१२ मध्ये लीसेस्टरशायरसाठी केला होता.
सलग ८ षटकार मारले
आकाश जेव्हा ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला तेव्हा मेघालयने ५७६ धावा केल्या होत्या आणि त्यांचे ६ विकेट गेले होते. पण आकाशने मैदानात उतरताच त्याचं वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. त्याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना काही षटकांतच उद्ध्वस्त केले. त्याने सलग ८ षटकार मारले, ज्यात गोलंदाज लिमार दाबीच्या एकाच षटकात ६ षटकार मारले गेले. टी-२० सामन्यांमध्येही हा पराक्रम दुर्मिळ आहे. आकाश १४ चेंडूत ५० धावांवर नाबाद राहिला आणि त्याच्या खेळीमुळे मेघालयने ६ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक कुणी केले?
११ चेंडू: आकाश कुमार चौधरी (मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश, सुरत, २०२५)१२ चेंडू: वेन व्हाइट (लीसेस्टरशायर विरुद्ध एसेक्स, लीसेस्टर, २०१२)१३ चेंडू: मायकेल व्हॅन वुरेन (पूर्व प्रांत बी विरुद्ध ग्रिक्वालँड वेस्ट, क्रॅडॉक, १९८४/८५)१४ चेंडू: नेड एकर्सली (लीसेस्टरशायर विरुद्ध एसेक्स, लीसेस्टर, २०१२)१५ चेंडू: खालिद महमूद (गुजरांवाला विरुद्ध सरगोधा, गुजरांवाला, २०००/०१)१५ चेंडू: बंडेव सिंग (जम्मू आणि काश्मीर विरुद्ध त्रिपुरा, अगरतळा, २०१५/१६)
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तगडा रेकॉर्ड
हा केवळ रणजी ट्रॉफीचा विक्रम नाही तर फर्स्ट क्लास क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक आहे. हा विक्रम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या कित्येक दशकांचा जुने विक्रम मोडतो. भारतीयांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या बांदेव सिंगने यापूर्वी १५ चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता, जो आकाशने सहज मोडला. त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त आकाशने त्यानंतर नवीन चेंडूने गोलंदाजी केली आणि जलद एक विकेटही घेतली. तो त्याच्यासाठी एक संस्मरणीय दिवस होता. अरुणाचल प्रदेश ५९३ धावांनी पिछाडीवर आहे.
Web Summary : Akash Kumar Choudhary smashed the fastest first-class fifty in just 11 balls during a Ranji Trophy match against Arunachal Pradesh. He broke the record of England's Ven White. Akash hit eight consecutive sixes, helping Meghalaya to a massive total.
Web Summary : आकाश कुमार चौधरी ने अरुणाचल प्रदेश के खिलाफ रणजी ट्रॉफी मैच में सिर्फ 11 गेंदों में सबसे तेज प्रथम श्रेणी अर्धशतक बनाया। उन्होंने इंग्लैंड के वेन व्हाइट का रिकॉर्ड तोड़ा। आकाश ने लगातार आठ छक्के लगाए, जिससे मेघालय को विशाल स्कोर बनाने में मदद मिली।