Join us

लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी विराटने अनुष्काला दिल्या 'या' खास शुभेच्छा

विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर अनुष्कासाठी संदेश लिहीला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 13:08 IST

Open in App

मुंबई : 'विरुष्का' यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. गेल्या वर्षी 11 डिसेंबरला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी इटलीमध्ये लग्न केले होते. या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने विराटने अनुष्काला लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी खास संदेश दिला आहे.

विराटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर अनुष्कासाठी संदेश लिहीला आहे. विराटने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, " आपल्या लग्नाला आज एक वर्ष झाले यावर विश्वास बसत नाही. कारण हा प्रवास अविस्मरणीय असाच होता. त्यामुळे काल आपले लग्न झाले आहे. असं मला वाटतं आहे. माझी सर्वात जवळची मैत्रिण आणि पत्नी अनुष्काला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा." 

हा पाहा खास व्हिडीओ

 

टॅग्स :विरूष्काविराट कोहलीअनुष्का शर्माविरूष्का वेडिंग