Join us  

मैदानात लागली आग आणि खेळाडू थेट गेला हॉस्पिटलात; नेमकं घडलं तरी काय...

सामन्यातील दुसरा डाव सुरु असताना ही आग लागली. आग एवढी भयंकर होती की, त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 6:23 PM

Open in App

मुंबई : मैदानातच भयंकर आग लागल्याची घटना एका सामन्यात घडली. ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की एका खेळाडूला थेट हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले.

सामन्यातील दुसरा डाव सुरु असताना ही आग लागली. आग एवढी भयंकर होती की, त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण तरीही या आगीचा त्रास खेळाडूंना होऊ लागला. यावेळी एका खेळाडूला उपाचारांसाठी थेट हॉस्पिटलमध्येच नेण्याची वेळ आली.

ही गोष्ट घडली ती ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये. यावेळी सिडनी थंडर्स और अॅडलेड स्ट्राइकर्स यांच्यामध्ये सामना सुरु असताना आग लागली. ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की, सर्वत्र धूर पसरला होता. या धुराचा त्रास ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडलला झाला. सिडलला असह्य वाटत होते. त्यामुळे त्याला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता सिडलची प्रकृती सुधारली असल्याची माहिती मिळत आहे.

टॅग्स :आॅस्ट्रेलिया