चेन्नई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे. आयपीएलमध्ये काल चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीमध्ये याचा क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा प्रत्यय आला. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने आपल्या चपळ यष्टीरक्षणाचे गुपित उघड केले आहे. ''सुरुवातीच्या काळात टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने माझ्या यष्टीरक्षणामध्ये चपळता आली असावी, मात्र असे असले तरी खेळातील प्राथमिक गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिथून तुम्ही उच्च पातळीवर पोहोचू शकता.'''असे धोनीने सांगितले. यष्टीरक्षणातील चपळतेबाबत धोनी म्हणाला की,''टेनिस बॉलने क्रिकेट खेळल्याने माझ्या यष्टीरक्षणामध्ये चपळता आली असावी, मात्र असे असले तरी खेळातील प्राथमिक गोष्टींची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तिथून तुम्ही उच्च पातळीवर पोहोचू शकता. मात्र तुम्ही स्वत:मध्ये बदल केला नाही तर तुमच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे यष्टीरक्षणातील प्राथमिक गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते.''
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित
अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 15:24 IST