Join us

Finally इरफान पठाणने त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवला, रितेश देशमुख म्हणाला....

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan ) याच्या पत्नीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगताना दिसली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 10:58 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan ) याच्या पत्नीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगताना दिसली आहे. इरफानने कधीच त्याच्या पत्नीचा चेहरा जगासमोर आणला नव्हता. इरफानने यापूर्वी पोस्ट केलेल्या अनेक फोटोंमध्ये त्याची पत्नी एकतर बुरखा घालून दिसली, नाहीतर तिने चेहरा लपवलेला होता. त्यामुळे ती नेमकी कशी दिसते याची सर्वांना उत्सुकत होती आणि लग्नाच्या आठव्या वाढदिवशी इरफानने त्याच्या पत्नीचा चेहरा दाखवला. इरफानने पत्नीसोबतचा एक फोटो पोस्ट करून तिच्यासाठी रोमँटीक पोस्ट लिहिली. चाहत्यांनी त्याच्या पत्नीच्या सुंदरतेचं गुणगान गायले आणि त्यात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh ) यानेही कमेंट केली.

इरफान पठाणची पत्नी सफा ही सौदी अरेबियात मॉडेल होती. तिचे शालेय शिक्षण जेद्दाहमधील इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून केले. शाळा पूर्ण केल्यानंतर सफा बेगला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. रूढिवादी मुस्लिम कुटुंबात वाढलेले असूनही, सफा बेगच्या पालकांनी त्यांच्या मुलीला तिचे करिअर निवडण्यासाठी नेहमीच पाठिंबा दिला. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सफा ही आखाती देशातील सर्वात लोकप्रिय मॉडेल बनली. तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीव्यतिरिक्त, सफाला नेल आर्टमध्ये देखील खूप रस आहे आणि ती खूप चांगली आहे. तिची नेल आर्ट तुम्ही अनेकदा तिच्या चित्रांमध्ये पाहू शकता. 

४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका छोट्याशा लग्नसोहळ्यात इरफान पठाण आणि सफा बेग एकमेकांचे कायमचे बनले. २० डिसेंबर २०१६ रोजी इरफान आणि सफा यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. डिसेंबर २०२१ मध्ये इरफान आणि सफा पुन्हा एकदा एका मुलाचे पालक झाले. इरफानने पोस्ट लिहीली की, अनंत भूमिका एका आत्म्याने साकारल्या आहेत. मूड बूस्टर, विनोदी कलाकार, समस्या निर्माण करणारी आणि माझ्या मुलांची सोबती, मित्र आणि आई. या सुंदर प्रवासात मी तुला माझी पत्नी म्हणून जपतो. लग्नाच्या ८ वा वाढदिवसाच्या शुभेच्छा

रितेश देशमुखने या दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.... 

टॅग्स :इरफान पठाणरितेश देशमुखऑफ द फिल्ड