वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराटला श्रीलंकेच्या 'या' खेळाडूची वाटत होती भीती

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेता आमिर खान एका टीव्ही चॅट शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:05 IST2017-10-04T12:13:43+5:302017-10-04T16:05:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
In the final of World Cup, Virat was afraid of Sri Lankan 'The' players were feeling afraid | वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराटला श्रीलंकेच्या 'या' खेळाडूची वाटत होती भीती

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराटला श्रीलंकेच्या 'या' खेळाडूची वाटत होती भीती

ठळक मुद्दे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेता आमिर खान एका टीव्ही चॅट शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत.. या कार्यक्रमात आमिर खान आणि विराट कोहली त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्स सांगणार आहेत.विराटने त्याच्या करिअरबद्दल, अनुष्काबरोबरच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेता आमिर खान एका टीव्ही चॅट शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत. विराट फॅन्ससाठी हे खास दिवाळी गिफ्ट असणार आहे. या कार्यक्रमात आमिर खान आणि विराट कोहली त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्स सांगणार आहेत. विराट आणि आमिर असलेल्या या भागाचं शूटिंग नुकतंच पार पडलं. या कार्यक्रमात विराटने त्याच्या करिअरबद्दल, अनुष्काबरोबरच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. समीर अल्लाना नावाची व्यक्ती या चॅट शोच्या शूटिंगला उपस्थित होती. त्या कार्यक्रमात विराटने दिलेली उत्तर समीर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितली आहेत. 

2011 च्या वर्ल्डकपबद्दलही विराटने मजेशीर किस्सा सांगितला. त्या सामन्यात मलिंगा यॉर्कर टाकेल, याचीच मला भीती वाटत होती. सुरूवातीला मी खूप निराश होतो. पण 2-3 बॉलनंतर थोडा स्थिरावलो, असं त्याने सांगितलं. मॅचसाठी मी आधीच निराश होतो त्याचवेळी मलिंगा यॉर्कर टाकेल, याची भीती असल्याचं सांगून वर्ल्ड कप दरम्यान मनात असलेल्या भीतीचा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात विराटला त्याच्या क्रिकेटमधील प्रवासाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

विराटला पडलेलं छीकू नाव नेमकं पडलं कसं याबद्दलही विराटने सांगितलं आहे. अंडर 17च्या वेळी मी हेअरकट केली होती. त्या हेअरकटमध्ये माझे काम मोठे कान दिसत होते. त्यावरूनच मला छीकू नाव पडलं. महेंद्रसिंग धोनीने मला छीकू बोलायला सुरूवात केली.

या चॅट शोमध्ये अनुष्काबरोबरच्या नात्याबद्दल विराटने म्हंटलं की, अनुष्का खूप प्रामाणिक आणि मायाळू आहे, हीच तिची गोष्ट मला फार आवडते. पण ती प्रत्येक वेळी 5-7 मिनीटं उशिराने येते ही तिची सवय मला आवडत नाही. प्रत्येक वेळी ती माझ्याबरोबर असते त्यामुळे दोघांमध्ये समजूतदारपणा आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत या काळात तिने मला एक माणूस म्हणून माझ्यात खूप सुधारणा केली आहे.  विराट कोहलीने राम रहीमची भेट घेतल्यावरही उत्तर दिलं. या भेटीतील सर्वात विनोदी गोष्ट म्हणजे राम रहीमने आशिष नेहरा आणि युसुफ पठाणचा उल्लेख जगदीश नेहरा आणि जोसूफ पठाण असा उल्लेख केला.

आमिरच्या आवडत्या सिनेमांबद्दलही विराटने या मुलाखतीत सांगितलं. जो जिता वोही सिकंदर, 3 इडियट्स, पीके हे सिनेमे आवडत असल्याचं विराटने सांगितलं. विराटला पीके सिनेमा आवडणारच अशी फिरकीही आमिरने घेतली. कारण त्यात अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. 

माझ्या घरातील मी तिसरा मुलगा आहे. त्यामुळे मला जे हवं ते करायची सूट होती. माझा भाऊ मला मॅचसाठी सोडायला यायचा आणि वडील आवडीने मॅच बघायचे, असं विराटने या चॅट शो दरम्यान सांगितलं आहे.
 

Web Title: In the final of World Cup, Virat was afraid of Sri Lankan 'The' players were feeling afraid