भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा!

T20 World Cup: आजच्याच दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग स्टेडियमवर भारताच्या युवा संघानं इतिहास घडवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:04 PM2021-09-24T18:04:35+5:302021-09-24T18:11:32+5:30

whatsapp join usJoin us
film on t20 world cup 2007 victory will be made announced by close friend ms dhoni | भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा!

भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर चित्रपट येतोय, टिझर आला समोर; धोनीच्या खास मित्राची घोषणा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup: आजच्याच दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर २००७ साली दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग स्टेडियमवर भारताच्या युवा संघानं इतिहास घडवला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघानं पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर मात करत दिमाखात स्पर्धेचं जेतेपद प्राप्त केलं होतं. भारताच्या या विजायाची क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. 

24 सप्टेंबर! आजचाच तो दिवस, समोर पाकिस्तान उभा होता; धोनीने T20 वर्ल्डकप जिंकला होता

अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर ५ धावांनी मात करत जेतेपदावर कब्जा केला होता आणि संपूर्ण देशभर जल्लोष साजरा करण्यात आला होता. याच ऐतिहासिक प्रसंगावर लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारताच्या टी-२० वर्ल्डकप विजयाला आता १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी धोनी अन् जडेजामध्ये रंगला सामना!, धोनीनं केली गोलंदाजी; पाहा...

एमएस धोनीचा खास मित्र आणि चित्रपट निर्माता गौरव बहिरवानी यानं आपल्या ट्विटर हँडलवरुन या चित्रपटाची घोषणा केली आहे. इतकंच नव्हे, तर चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. 'हक से इंडिया' असं या चित्रपटाचं नाव असणार असून भारतीय संघानं २००७ साली केलेल्या विश्वविजयी कामगिरीच्या कथानकावर आधारित असणार आहे. टिझर व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला रवी शास्त्री यांचं समालोचन सुरू असताना ऐकू येतं आणि चित्रपटाचं शिर्षक यात दाखवण्यात आलं आहे. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर भेटीला येत असल्याचंही यात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे. 

गौरव बहिरवानी यांनी हा व्हिडिओ शेअर करताना टी-२० विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनाही टॅग केलं आहे. नुकतंच गौरव यांनी भारतीय संघाला २००७ सालचा टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलेल्या फिरकीपटू हरभजन सिंग याची मुलाखत घेतली होती. यात गौरव यांनी हरभजनकडून काही खास आठवणी जाणून घेतल्या होत्या. 

२००७ साली धोनी ब्रिगेडनं घडवला होता इतिहास
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी २४ सप्टेंबर हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस राहिला आहे. याच दिवशी २००७ साली जोहान्सबर्गमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला गेला होता. मिसबाह उल हकच्या त्या चुकीच्या फटक्यानंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष पाहायला मिळाला होता. कारण भारतानं पहिल्याच वर्षी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर केलं होतं. 

दिल्ली कॅपिटल्स म्हणतंय नॉर्खियावर कारवाई करा; त्याला ठरवलं गुन्हेगार! नेमका गुन्हा काय?

भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांच्या अखेरीस ५ विकेट्सच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर पाकिस्तानचा संघ १९.३ षटकांमध्ये १५२ धावांवरच गारद झाला होता. अखेरच्या षटकात मिसबाह उल हक यानं स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट श्रीकांतच्या हातात गेला. श्रीशांतनं कोणतीही चूक न करता झेल टिपत भारताला ऐतिहासिक विजय प्राप्त करुन दिला होता. 

Web Title: film on t20 world cup 2007 victory will be made announced by close friend ms dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.