Join us

पंधरा चेंडू, दोन धावा, चार बळी आणि सामना विजयी;  हा मॅजिक स्पेल तुम्ही पाहिलं का...

एका स्पेलमध्ये पंधरा चेंडूंत सामना पालटवण्याची किमया एका गोलंदाजाने करून दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:54 IST

Open in App
ठळक मुद्देकाही वेळा क्रिकेटच्या मैदानात असे मॅजिक स्पेल पाहायला मिळतात की, सारे काही विसरून आपण त्यामध्ये रमतो. असाच एक स्पेल भारतातील चाहत्यांना पाहायला योग आला.

नवी दिल्ली : काही वेळा क्रिकेटच्या मैदानात असे मॅजिक स्पेल पाहायला मिळतात की, सारे काही विसरून आपण त्यामध्ये रमतो. असाच एक स्पेल भारतातील चाहत्यांना पाहायला योग आला. एका स्पेलमध्ये पंधरा चेंडूंत सामना पालटवण्याची किमया एका गोलंदाजाने करून दाखवली आहे.

प्रतिस्पर्धी संघाची 262 धावांचा पाठलाग करताना 5 बाद 210 चांगली स्थिती होती. एक फलंदाज शतकासमीप आला होता, तर दुसऱ्याने अर्धशतक झळकावले होते. त्यावेळी 123 धावांची भागीदारीही झाली होती. त्याचवेळी कर्णधाराने फिरकीपटू मयांक मार्कंडेच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्याने पंधरा चेंडूत फक्त दोन धावा देत चार बळी मिळवण्याची किमया साधली. मयांकचा हा मॅजिक स्पेल देवधर करंडक स्पर्धेत पाहायला मिळाला.

देवधर करंडक स्पर्धेत आज भारत 'अ' आणि भारत 'ब' यांच्यामध्ये आज सामना झाला. भारत 'ब' संघाने प्रथम फलंदाजी करताना 261 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारत 'अ' संघाची 5 बाद 87 अवस्था होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक (99) आणि आर. अश्विन (54) यांनी सहाव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी रचली होती. पण मयांकने अश्विनला बाद केले आणि त्यानंतर तीन बळी पटकावत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :आर अश्विनदिनेश कार्तिक