महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलले, खांद्यावर घेऊन गरागरा फिरवले, आता Video होतोय व्हायरल

Yuzvendra Chahal Viral Video: लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तो कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसलेला नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:14 AM2024-03-03T10:14:26+5:302024-03-03T10:15:57+5:30

whatsapp join usJoin us
Female wrestler Sangeeta Fogat picked up Yuzvendra Chahal, carried him on his shoulder, now the video is going viral | महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलले, खांद्यावर घेऊन गरागरा फिरवले, आता Video होतोय व्हायरल

महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलले, खांद्यावर घेऊन गरागरा फिरवले, आता Video होतोय व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तो कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसलेला नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारताची महिला कुस्तीपटू संगीता फोगाट ही चहलला उचलून खांद्यावर घेत गरागरा फिरवताना दिसत आहे. त्यामुळे चहलची झालेली अवस्था पाहण्यासारखी आहे.

युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिने झलक दिखला जा या नृत्यावर आधारित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. चहलही या कार्यक्रमादरम्यान, पत्नीला खूप पाठिंबा देताना दिसतो. धनश्री हिला मतदान करण्याचं आवाहन तो चाहत्यांना वारंवार करत असतो. दरम्यान, या कार्यक्रमाच्या सेटवर भारताची महिला कुस्तीपटू संगीता फोगाट हिने चहलची मस्करी करण्याची संधी सोडली नाही.

‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता फोगाट हिने युजवेंद्र चहल याला उचलून घेतले. आणि खांद्यावर आडवे धरून गरागरा फिरवले. त्यामुळे चहला काही काळ चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर चहलने हसत हसत संगीता फोगाट हिला थांबण्यास सांगितले.

संगीता फोगाट हिनेही या कार्यक्रमामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. मात्र ती स्पर्धेतून बाद झाली आहे. संगीता फोगाट ही कुस्तीपटू बजरंग पूनिया याची पत्नी आहे. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू गीता फोगाट हिची बहीण आहे.  

Web Title: Female wrestler Sangeeta Fogat picked up Yuzvendra Chahal, carried him on his shoulder, now the video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.