Join us
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्स आमची घरे जाळून टाकतील, तुम्ही पराभूत व्हा; वॉर्नचा मलिकवर फिक्सिंगचा आरोप

वॉर्नने सांगितले की, कराची कसोटीबाबत आम्ही पूर्ण आश्वस्त होतो की, आम्ही सामना जिंकू, सामन्याच्या दरम्यान खोलीच्या बाहेर कुणीतरी दार ठोठावले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 05:45 IST

Open in App

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नची डॉक्युमेंट्री ‘शेन’ लवकरच येणार आहे. यात वॉर्न याने अनेक खुलासे केले आहेत. वॉर्न याने २८ वर्षे पूर्वीचा एक खुलासा देखील केला. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट नक्कीच लाजिरवाणे होईल. वॉर्न याने पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक याच्यावर सामना निश्चितीसाठी ऑफर देण्याचा आरोप केला आहे.

शेन वॉर्न याने न्यूज.कॉम.एयूला सांगितले की, १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. तेव्हा कराची कसोटीच्या आधी पाकिस्तान संघाचा कर्णधार सलीम मलिक याने वॉर्न आणि संघाला खराब गोलंदाजी करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती. त्याने वॉर्नला २ लाख डॉलर (जवळपास ६२ लाख रुपये) देण्याचा प्रस्ताव दिला होता. जर पाकिस्तानचा संघ मायदेशातच कसोटीत पराभूत झाला तर लोक त्यांची घरे जाळून टाकतील.

मलिकची ऑफरवॉर्नने सांगितले की, कराची कसोटीबाबत आम्ही पूर्ण आश्वस्त होतो की, आम्ही सामना जिंकू, सामन्याच्या दरम्यान खोलीच्या बाहेर कुणीतरी दार ठोठावले. त्याने त्याचे नाव सलीम मलिक सांगितले. आम्ही गेट उघडले त्याला आत बसवले. गप्पा सुरू असताना सलीम म्हणाला की, आम्ही पराभूत होऊ शकत नाही. तुम्ही समजू शकत नाही. जर आम्ही मायदेशातच हरलो तर आमच्यासोबत काय होईल. आमची घरे जाळून टाकली जातील. आमच्या कुटुंबांना देखील जाळले जाईल. ’ सलीमच्या या बोलण्यावर वॉर्नला देखील कळले नाही की काय बोलावे. त्यानंतर सलीमने ऑफर दिली. थोड्या वेळासाठी का होईना पण मी भरकटलो होतो. मात्र मी स्वत:ला सांभाळले आणि त्याला सांगितले की, मला जास्तीचे पैसे नको. मी खराब गोलंदाजी नाही करणार. पाकिस्तानच त्या सामन्यात जिंकला होता.’

टॅग्स :पाकिस्तान
Open in App