चाहत्यांनी गावस्कर यांना डिवचले, जॅक्सनची चाहत्यांवर टीका

भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांना चाहत्यांनी डिवचले आहे. मुफद्दल वोहरा या क्रिकेट चाहत्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 22:11 IST2020-10-08T22:08:58+5:302020-10-08T22:11:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Fans slam Gavaskar, Jackson criticizes fans | चाहत्यांनी गावस्कर यांना डिवचले, जॅक्सनची चाहत्यांवर टीका

चाहत्यांनी गावस्कर यांना डिवचले, जॅक्सनची चाहत्यांवर टीका

 

नवी दिल्ली -  भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांना चाहत्यांनी डिवचले आहे. मुफद्दल वोहरा या क्रिकेट चाहत्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आणि त्यात म्हटले की ‘गावस्कर खुप छोटे आहेत.’ या फोटोत गावस्कर हे केविन पीटरसनच्या बाजुला उभे आहेत.  यावर सौराष्ट्रचा रणजीपटू शेल्डन जॅक्सन याने या चाहत्याला चांगलेच धारेवर धरले. जॅक्सनने ट्विट केले की, कदाचित ते शारीरिक उंचीने कमी असतील. पण त्यांनी देशासाठी जे मिळवले आहे. ते कदाचित शारीरिकदृष्ट्या उंच असलेल्यांनाही जमणार नाही.

शेल्डन याच्या या ट्विटमुळे अनेक नेटिझन्सनी त्याचे कौतुक केले आहे. सुनील गावस्कर यांनी काही दिवस आधीच विराट कोहलीच्या खेळामुळे त्याची
पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यावर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यावर सगळीकडून टीका झाली होती. तशाच प्रकारच्या शब्दांचा उपयोग
करून आज चाहत्यांने त्यांच्यावर टीका केली. मात्र गावस्कर यांच्यासारख्या महान खेळाडूवर अशा प्रकारची टीका योग्य नसल्याचेही अनेकांनी ट्विटरवर त्याला सुनावले आहे. जॅक्सनच्या फटक्यानंतर मुफद्दल वोहरा या अकाऊंट युझरने हे टिष्ट्वट डिलीट केले आहे.

Web Title: Fans slam Gavaskar, Jackson criticizes fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.