भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा आणि अंडर-१९ संघातील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यानंतर वैभवचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये वैभव मैदानावर पूर्णपणे फिल्डिंग करताना दिसत आहे. यावेळी स्टँड्समध्ये बसलेले चाहते त्याला सतत हाक मारत आहेत. "अरे वैभव, एक नजर इकडे टाक," अशी विनवणी चाहते करत आहेत, पण वैभवने खेळावर लक्ष करत आहे. त्यानंतर एका चाहत्याने ओरडून म्हटले की, अरे, मर्दा एकदा मागे वळून पाहा, आम्ही खास तुला भेटण्यासाठी बिहारहून आलो आहोत. आपल्या लाडक्या खेळाडूसाठी भेटण्यासाठी बिहारहून दुबाईला गेलेल्या चाहत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ १४ डिसेंबर २०२५ रोजी दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-१९ सामन्यातील आहे. या रोमांचक सामन्यात भारतीय युवा संघाने पाकिस्तानचा ९० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत वर्चस्व राखले.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळली. सलामीवीर वैभव सूर्यवंशी केवळ ५ धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर आरोन वर्गीसने (८५ धावा) डावाची धुरा सांभाळली. त्याला कर्णधार आयुष म्हात्रे (वय, ३८) आणि कनिष्क चौहान (वय, ४६) यांची मोलाची साथ लाभली. भारताने ४६.१ षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. ४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४१.२ षटकांत अवघ्या १५० धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून हुजैफा अहसानने सर्वाधिक ७० धावा केल्या. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर इतर फलंदाजांचा निभाव लागला नाही.
वैभव सूर्यवंशी हा बिहारचा असून त्याने अत्यंत कमी वयात भारतीय अंडर-१९ संघात स्थान मिळवले. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याची तुलना मोठ्या खेळाडूंशी केली जाते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला असला, तरी मैदानातील त्याची शिस्त आणि त्याच्यासाठी चाहत्यांनी केलेली गर्दी त्याची वाढती लोकप्रियता दर्शवते.