Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सामन्यात कपडे काढून तो धावला, सुरक्षा रक्षकांना पळ पळ पळवलं

क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षकांकडून व्यत्यय आणला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 13:00 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडने पहिली कसोटी जिंकलीश्रीलंकेवर 211 धावांनी विजय तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी

कोलंबो : क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षकांकडून व्यत्यय आणला गेला आहे. कधीकधी तर हे चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला हात मिळवण्यासाठी चक्क मैदानावर धाव घेताना पाहिले आहेत. गेल्या महिन्यात विजय हजारे चषक स्पर्धेतील एका सामन्यात फॅन रोहित शर्माला भेटण्यासाठी 9 फुटांची सुरक्षाजाळी ओलांडून मैदानावर धावला होता. असाच काहीसा परंतु थोडासा आश्चर्यकारक प्रकार श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. हा सामना इंग्लंडने जिंकला, परंतु चाहत्याचे ते कृत्य चर्चेचा विषय राहिला.

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात इंग्लंडने 211 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एका चाहता खेळाडूंना भेटण्यासाठी विवस्त्रच मैदानावर आला. त्याला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांची चांगलीच दमछाक झाली. चाहत्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजत आहे.

टॅग्स :इंग्लंडश्रीलंका