Join us

'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'MeeToo' ची आठवण करून दिली आहे. सचिनच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:04 IST

Open in App

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'MeeToo' ची आठवण करून दिली आहे. सचिनच्या एका ट्विटवरून ही गोष्ट घडल्याचे म्हटले जात आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचे कौतुक केले होते. सचिनने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " इंडियन आयडॉल या कार्यक्रमातील स्पर्धकांची गाणी आणि त्यांच्या आयुष्याच्या कहाण्या मनामध्ये घर करत आहेत. राहुल, चेल्सी, दिव्या आणि सनी हे चार स्पर्धक देशांतील विभिन्न भागांतून येतात, पण संगीताबद्दल त्यांच्यामध्ये समर्पण पाहायला मिळते. मला आशा आहे की ते मोठी मजल मारतील."

सचिनच्या या ट्विटनंतर सोनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोनाने म्हटले आहे की, " प्रिय सचिन सर, तुम्हाला 'MeeToo' बद्दल माहिती आहे का. इंडियन आयडॉल स्पर्धेचे परिक्षक आणि संगीतकार अन्नु मलिक यांचे नावही 'MeeToo' प्रकरणात आले होते. त्याचबरोबर निर्मात्यांचेही नाव यामध्ये होते. "  

टॅग्स :सचिन तेंडुलकरसोना मोहपात्राइंडियन आयडॉलमीटू