इंदूर : ‘कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात ‘सरप्राईज पॅकेज’ असेल,’ असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहेत. आयपीएलमध्ये कृष्णा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसºया टी२० सामन्यात मंगळवारी श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने युवा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.विराटने आगामी टी२० विश्वचषकात कोणत्या गोलंदाजाला संघात स्थान मिळेल, याबद्दल संकेत दिले. ‘कोणत्या खेळाडूची गोलंदाजी शैली चांगली आहे, हे शोधणे महत्त्वाचे आहे. आॅस्ट्रेलियात टी २० विश्वचषकासाठी एक खेळाडू सरप्राईज पॅकेज असेल. ज्याच्याकडे चांगला वेग असेल आणि जो आखूड टप्प्याचे चेंडू टाकू शकतो अशा खेळाडूला संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णा स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतोय. असे युवा गोलंदाज उपलब्ध असणे ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे,’ असे विराट म्हणाला.विराटने नवदीप सैनीचेही कौतुक केले. सैनीच्या खेळात आता आत्मविश्वास दिसायला लागलो. ज्यावेळी तो चांगल्या फॉर्मात असतो त्यावेळी तो सर्वोत्तम कामगिरी करतो, हे आपण पाहिले आहे, असे सांगून विराट पुढे म्हणाला, ‘सैनी एकदिवसीय क्रिकेटसह टी२० मध्ये बुमराह, भुवनेश्वर व शार्दुलसारख्या अनुभवी खेळाडूंसोबत चांगला मारा करीत आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज, चेंडू टाकणा-याला स्थान देण्याचे दिले संकेत
प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज, चेंडू टाकणा-याला स्थान देण्याचे दिले संकेत
‘कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात ‘सरप्राईज पॅकेज’ असेल,’ असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 06:57 IST