Join us

रातोरात स्टार झाली, पण बिच्चारी फसली; RCB फॅनगर्लला त्रास असह्य

झटपट प्रसिद्धीचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटेही असतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:12 IST

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : झटपट प्रसिद्धीचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटेही असतात. कधी कधी अतिप्रसिद्धीही डोकेदुखी ठरून जाते. याची प्रचिती दीपिका घोषला येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अखेरच्या सामन्यात दीपिका फेमस झाली. एका रात्री सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या दीड लाखांच्या वर गेली होती. एका रात्रीच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली दीपिका आता फॉलोअर्सच्या अश्लिल मॅसेजने हैराण झाली आहे. तिला त्याचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. 

बंगळुरूने आयपीएलच्या 12व्या मोसमातील अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची ही लढत बंगळुरूने 4 विकेट राखून जिंकली. शिमरोन हेटमायर ( 75) आणि गुरकिरत मन सिंग ( 65) यांनी फटकेबाजी करून बंगळुरूला 175 धावांचे लक्ष्य पार करून दिले. या विजयासह RCBने आयपीएलच्या 12व्या मोसमाचा निरोप घेतला. पण, RCBच्या या विजयापेक्षा प्रेक्षकांमध्ये असलेल्या दीपिकाचीच चर्चा अधिक रंगली. तिने इंस्टाग्रामवरून सर्वांचे आभारही मानले होते. ती म्हणाली,''मला कोणत्याही प्रसिद्धीची गरज नाही. मी सेलिब्रिटी नाही. मी एक सामान्य मुलगी आहे आणि टिव्हीवर झळकावे असेही मी काही केले नाही. तरीही तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे.''

पण आता ही प्रसिद्धी तिला डोईजड झाली आहे. तिला सोशल मीडियावरून अश्लिल मॅसेज येऊ लागले आहेत. ''लोकं टोकाचं गैतवर्तन करत आहेत आणि त्याचा मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. लोकांनी माझं नाव कसं माहीत पडलं, यावरून मी गोंधळलेली आहे. यामुळे माझं खासगी आयुष्य डिस्टर्ब झाले आहे. एका रात्री अनेक पुरुष फॉलोअर्स वाढले आणि त्यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून मला अश्लिल मॅसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे.''

 

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर